Emraan Hashmi’s magic continues : विशेष भट्ट यांच्या बहुप्रतीक्षित ‘अवारापन 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने भारतात 34.09 कोटी रुपयांची निव्वळ कमाई करत मोठा विक्रम नोंदवला आहे. यासह अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 54.79 कोटी रुपयांवर पोहोचली असून, चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल शो सुरू असून, अॅडव्हान्स बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने दमदार सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी कमाईत झालेली वाढ पाहता प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘अवारापन 2’ ने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘अवारापन’च्या भावविश्वात नेले आहे. इमरान हाश्मीचा लोकप्रिय आणि भावनिक अंदाज, रोमांस, अॅक्शन, थरार, भावना आणि गाजलेल्या संगीताची जादू या सिक्वेलमध्ये अधिक भव्य स्वरूपात अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे जुन्या चाहत्यांसह नव्या पिढीतील प्रेक्षकांचाही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पान मसाला जाहिरातींवर FDA चा बडगा; अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस
विशेष म्हणजे, चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत. चित्रपटातील भावनिक प्रसंग आणि अॅक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, अनेक ठिकाणी चाहत्यांकडून थिएटरमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असल्याने येत्या दिवसांत कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नितीन कक्कर दिग्दर्शित आणि बिलाल सिद्दीकी तसेच विशेष भट्ट लिखित ‘अवारापन 2’ मध्ये इमरान हाश्मी, दिशा पटानी, शबाना आझमी, पूरण गब्बी, सुविंदर विकी आणि अनिरुद्ध रावल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कलाकारांच्या दमदार अभिनयासह भव्य निर्मितीमूल्ये आणि भावनिक कथानकामुळे चित्रपटाला सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्स प्रस्तुत, विशेष भट्ट निर्मित तसेच दीपेश शाह आणि सुनमन सूद सहनिर्मित ‘अवारापन 2’ सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, भारतातील वितरणाची जबाबदारी पेन मरुधर यांनी सांभाळली आहे. पहिल्या दोन दिवसांतील कमाईचा वेग पाहता, हा चित्रपट यंदाच्या वर्षातील मोठ्या बॉक्स ऑफिस यशांपैकी एक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
