सुशिक्षित बेरोजगाराची धमाल गोष्ट उलगडणार! अंकुर वाढवेला लागली ‘कोलंबस”ची लॉटरी!

Columbus या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट येत्या ११ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Columbus

Columbus

Entertaining story of educated unemployed youth is set to unfold Ankur Vadve has hit jackpot with Columbus : अलीकडे शिक्षण, नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. विशेषतः सरकारी नोकरीसाठी धडपडणारे हजारो तरूण आजुबाजूला दिसतात. अशाच हजारो तरुणांची एक प्रातिनिधीक गोष्ट “कोलंबस” या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत रंजक कथानक, दमदार कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट येत्या ११ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

महागाईने खिसा रिकामा, नोकरीवरही संकट! महागाईला लगाम का लागत नाही? नोबेलविजेत्यांनी उलगडलं गणित

एस एस आर फिल्म्स प्रस्तुत सतीश नाईक, रोहित गुप्ता, सनोबर लाकडावाला यांनी “कोलंबस” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवींद्र शिवाजी यांनी दिग्दर्शन, गौरव कुलकर्णी यांनी छायालेखन, रोहन पाटील, सुयश जाधव यांनी संकलन, वैभव शिरोळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चैतन्य पिसाळ यांनी लेखन आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत केलं आहे, तर आनंद शिंदे, कैलास वाघमारे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. चित्रपटात अंकुर वाढवे, रोहित माने, सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले किरण माने त्याचबरोबर सिमरन खेडकर, अश्विनी भांडे, प्रसाद माने, हेमंत शिंदे, चंद्रकांत मोकल, संस्कार हिरे यांचा दमदार अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सुद्धा मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत. मुकुंद हंगेकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

ब्रिटिश सत्तेला हादरावणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचा धगधगता इतिहास; ‘पत्री सरकार 1942’ चे दमदार पोस्टर प्रदर्शित!

पश्चिम महाराष्ट्रातील एका गावात कैलास नावाचा सुशिक्षित तरुण असतो. त्याची उंची तीन फूट असते. त्याला शिक्षक व्हायची इच्छा असते पण शिक्षणाचं खासगीकरण, सरकारी शिक्षक भरती न होणे अशा अडचणींमुळे त्याचं शिक्षक होण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. अशा वेळी त्याला थेट अमेरिकेतून संधी चालून येते. अचानक आलेल्या या संधीमुळे त्याच्या आयुष्यात काय उलथापालथ होते याची रंजक गोष्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. “कोलंबस” हा चित्रपट त्याच्या आगळ्यावेगळ्या कथानकामुळे लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून अमेरिकेची संधी आलेल्या “कोलंबस”ची गोष्ट पाहणं हा धमाकेदार अनुभव ठरणार आहे.

Exit mobile version