काही हिरो जन्माला येतात, काही ट्रेनिंग घेतात… आणि काहींचं अपहरण होतं! अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ‘वाइब’चा धमाल टीझर केला रिलीज

जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा पुढे येऊन जबाबदारी सांभाळणाऱ्या हिरोंची गरज असते. इथे कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव यांची गोष्ट वेगळी आहे.

Untitled Design (98)

Untitled Design (98)

Exciting teaser of ‘Vibe’ released : जेव्हा दोन साधेसुधे मित्र अचानक अशा संकटात अडकतात, जे अजिबात साधं नसतं, तेव्हा काय होतं? अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज ‘वाइब’चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये कुणाल खेमूच्या या हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडीची पहिली झलक पाहायला मिळते. मजेशीर ह्यूमर, धमाकेदार अॅक्शन आणि भरपूर गोंधळाची धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा पुढे येऊन जबाबदारी सांभाळणाऱ्या हिरोंची गरज असते. पण इथे हार्दिक (कुणाल खेमू) आणि बग्स (स्पर्श श्रीवास्तव) यांची गोष्ट जरा वेगळी आहे. दोघेही या कामासाठी तयार नाहीत आणि देश वाचवण्याची जबाबदारीही त्यांना घ्यायची नसते. मात्र, परिस्थिती अशी निर्माण होते की ही जबाबदारी अखेर दोघांनाच उचलावी लागते.

‘वाइब’च्या नव्या टीझरमध्ये या भन्नाट जोडीच्या मिशनची मजेशीर झलक पाहायला मिळते. प्रीती जी जिंटा यांच्या दमदार व्यक्तिरेखेमुळे या दोघांना एकामागून एक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रीती यांची व्यक्तिरेखा अतिशय कॉन्फिडंट असून, संपूर्ण परिस्थितीची सूत्रे जणू त्यांच्या हातातच असल्याचे दिसते. त्यांचा बॉस-लेडी अंदाज टीझरमध्ये खास लक्ष वेधून घेतो.

‘शाळेत गुरु नाहीत, मग देश विश्वगुरू कसा होणार?’; कन्हैया कुमारांचा मोदी सरकारला सवाल

टीझरमध्ये वेगवान कार चेज, धमाकेदार अॅक्शन आणि मजेशीर प्रसंगांची रेलचेल आहे. ‘वाइब’चा टीझर स्पष्टपणे सांगतो की, चित्रपटात विचित्र परिस्थिती, अनपेक्षित हिरो आणि अनेक मोठे सरप्राइजेस पाहायला मिळणार आहेत.

कुणाल खेमू यांनी ‘वाइब’चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. कुणाल खेमू आणि चिराग निहलानी यांनी ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात कुणाल खेमू यांच्यासोबत प्रीती जी जिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि पदार्पण करणारी वंशिका धीर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तर दिनेश लाल यादव आणि यशपाल शर्मा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अमेझॉन एमजीएम स्टुडिओजचा ‘वाइब’ 18 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version