Download App

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, घरातच आढळला मृतदेह

  • Written By: Last Updated:

पुणेः मराठी चित्रपटासृष्टीतील प्रसिध्द अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी (Ravindra Mahajani)हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ते 77 वर्षांचे होते. महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी येथे बंद घरात मृतदेह आढळून आला आहे. महाजनी हे अनेक महिन्यांपासून येथे भाडेतत्त्वावर राहत होते. त्यांच्या घरातून वास येऊ लागल्यानंतर रहिवाशांनी ही माहिती पोलिसांना दिली. (famous marathi actor ravindra mahajani found dead talegaon pune)

अभिनेते रवींद्र महाजनी हे गेल्या नऊ महिन्यांपासून मावळमधील आंबीमधील एक्सब्रिया सोसायटीमध्ये राहत होते. ते एकटेच राहत होते. शुक्रवारी दुपारी घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारील रहिवासांनी ही माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे.

महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली आहे.शवविच्छेदनंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुंबईचा फौजदार, झुंज, हळदी कुंकू चित्रपट गाजले

रवींद्र महाजनी यांनी हिंदी, मराठी चित्रपटात, नाटकात काम केले आहे. त्यांचा देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, हळदी कुंकू हे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. रंजना, उषा नाईक, आशा काळे या दिग्गज अभिनेत्रींसोबत महाजनी यांची खास जोडी जमली होती.त्यांनी अनेक चित्रपट गाजविले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील एक देखणा अभिनेता म्हणून महाजनी यांची ओळख होती.

Tags

follow us