Download App

साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचं टोकाचं पाऊल; राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं

बेंगळुरूच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता गुरुप्रसाद त्यांच्या चित्रपटाच्या

  • Written By: Last Updated:

GuruPrasad Sucide : भारतीय मनोरंजनसृष्टीत एक दुःखद घटना घडली आहे. (GuruPrasad) ‘एडेलू मंजुनाथ’, ‘डायरेक्टर्स स्पेशल’ सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे कन्नडचे प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रविवारी 3 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या त्यांच्या अपार्टमेंटमध्ये वयाच्या 52 व्या वर्षी या दिग्दर्शकाने आयुष्य संपवलं. दरम्यान, पैशांच्या अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं बोलल जातय.

पाच-सहा दिवसांपूर्वीच घेतली फाशी

बेंगळुरूच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता गुरुप्रसाद त्यांच्या चित्रपटाच्या कोणत्यातरी गोष्टीला घेऊन अस्वस्थ होते. गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली असणाऱ्या या दिग्दर्शकांन चार-पाच दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. बेंगळुरूच्या अपार्टमेंट मध्ये रविवारी सायंकाळी सडलेल्या अवस्थेत या दिग्दर्शकाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; सोशल मीडियावर केला फोटो शेअर

आर्थिक अडचणीचा तणाव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक गुरुप्रसाद हे गेल्या अनेक दिवसांपासून पैशांच्या तंगीमुळे तणावाखाली होते. त्यांच्या अचानक जाण्याने दक्षिण भारतीय मनोरंजनसृष्टीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 5 ते 6 दिवसांपूर्वीच दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी गळफास घेऊन त्याचा मृत्यू झाल्याचं समजते.

गुरुप्रसाद यांचे लोकप्रिय चित्रपट

कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट मनोरंजन सृष्टीला दिले आहेत. त्यांची एडलु मंजुनाथ ही फिल्म लोकांना प्रचंड आवडली. 2006 मध्ये माता या चित्रपटाचा डेब्यू केला. अनेक चित्रपटांची नामांकने आणि पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत.

follow us

संबंधित बातम्या