चाहत्यांची उत्सुकता शिगेला! प्राइम व्हिडीओ उद्या जाहीर करणार द फैमिली मैन सीज़न 3 ची रिलीज डेट

The Family Man Season 3 चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांकडू सीजन 3 ची रिलीज डेटची घोषणा करण्यात येणार आहे.

Letsupp (17)

Letsupp (17)

Fans’ curiosity at its peak Prime Video will announce the release date of The Family Man Season 3 tomorrow : गेल्या चार वर्षांपासून चाहते प्राइम व्हिडीओच्या द फॅमिली मॅनच्या सीजन 3 चे आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामध्ये आता चाहत्यांची उत्सुकता अखेर संपणार आहे. कारण आता निर्मात्यांकडून द फॅमिली मॅनच्या सीजन 3 ची रिलीज डेटची घोषणा करण्यात येणार आहे. प्राइम व्हिडीओन या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

संपदा हॉटेलला गेल्यानंतर ती रात्रभर प्रशांतला…, रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती?

दरम्यान गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहते सोशल मिडीयावर याबाबत वारंवार कमेंटकरून अपडेट्स मागत होते. गेल्या चार वर्षांपासून चाहते प्राइम व्हिडीओच्या द फॅमिली मॅनच्या सीजन 3 चे आतुरतेने वाट पाहत होते. पण आता अखेर जो दिवस आला आहे. जेव्हा चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सीरीजच्या तिसऱ्या सीजनची रिलीज डेट समजणार आहे. या सीरीजचे चाहते फक्त भारतच नाही तर जगभरातील लोक या सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे चाहते केवळ प्राइम व्हिडीओच नाही तर यातील कलाकारांच्या सोशल मिडीयावर देखील याबाबत विचारणा केली जात आहे. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

https://www.instagram.com/reel/DQTT7IoE_Jx/?igsh=Ym5pbWhrZDl2bWd0

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी परिवहन विभाग सज्ज! 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान 1150 जादा एसटी बसेस सोडणार

या सीरीजबद्दल सांगायचं झालं तर राज आणि डीके यांनी त्यांच्या डी 2 आर या बॅनरच्याखाली निर्मिती केलेल्या या द फॅमिली मॅन सीरीजमध्ये हेरगिरी आणि अॅक्शन भरपूर आहे. यामध्ये दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत जयदीप अहलावत, निमरत कौर, शारिब हासमी, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धन्वंतरी आणि गुल पनाग यांसारख्या अष्टपैलू कलाकारांचा सहभाग आहे. ही सीरीज राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिली आहे. संवाद सुमित अरोरा यांनी तर दिग्दर्शन राज, डीके यांनीचं केल आहे. तर या तिसऱ्या सीजनमध्ये सुमन कुमार आणि तुषार सेठ देखील दिग्दर्शनात आले आहेत.

Exit mobile version