Salman Khan : सलमानचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते झाले उदास

मुंबई : सर्वांचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडीओ पाहून सध्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते उदास झाले आहेत. भाईजानला नेमकं काय झालं, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. हे व्हिडीओ आणि फोटो वांद्रे इथल्या दवाखान्या बाहेरचे आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सलमान त्याच्या नेहमीच्या स्वॅगमध्ये दिसला नाही. उलट तो आजारी असल्यासारखा वाटला. त्याच्या चेहऱ्यावर […]

Salman Khan Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार

Salman Khan

मुंबई : सर्वांचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडीओ पाहून सध्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते उदास झाले आहेत. भाईजानला नेमकं काय झालं, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. हे व्हिडीओ आणि फोटो वांद्रे इथल्या दवाखान्या बाहेरचे आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सलमान त्याच्या नेहमीच्या स्वॅगमध्ये दिसला नाही. उलट तो आजारी असल्यासारखा वाटला. त्याच्या चेहऱ्यावर उदासिनता दिसत होती, त्याची दाढीही वाढलेली होती.

सलमानचा हा कधीही न दिसलेला लूक चाहत्यांना हैराण करणारा आहे. कारण भाईजान सलमान खान नेहमीच्या स्वॅगमध्ये दिसला नाही. त्यामुळे चाहत्यांनी या व्हिडीओ आणि फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘सलमान भाई सर्वांपेक्षा वेगळाच!’ तर दुसऱ्यानं लिहिलं की, ‘वाघ जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा… जलवा है भाई!’ तर अन्य एकानं लिहिलं की, ‘सर्वांचा बाप आहे. लोक काहीही म्हणोत. माझ्या समोरूनच याची गाडी गेली. तो एका जिमच्या उद्घाटनाला गेला होता.’ असं म्हणत सलमानची बाजू घेतली आहे.

Sanjay Raut : मोदी व शाह यांनी जावेद अख्तर यांचे कौतुक करायला पाहिजे

गेल्या काही दिवसांपूर्वीच सलमान शाहरूख खानच्या पठाण सिनेमामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. तर लवकरच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात दिसणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या सिनेमात पूजा हेगडे वेंकटेश दग्गुबाती, जगपति बाबू, भूमिका चावला, अभिमन्यू सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शाहनाज गिल, पलक तिवारी आणि विनय भटनागर हे कलाकारही आहेत. सलमान खानचा बहुप्रतिक्षीत टायगर 3 हा सिनेमादेखील तयार झाला आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी आहेत.

Exit mobile version