Site icon Letsupp | मराठी बातम्या, ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज | Marathi News Online

King Khan ला’ एका इव्हेंटमध्ये महिलेनं केलं किस; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले…

King Khan

King Khan

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खान हा त्याच्या सिनेमामुळे कायम चर्चेत असतो. किंग खानाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच किंग खान हा दुबईला (Dubai) एका इव्हेंटसाठी गेला होता. या इव्हेंटमधील काही चाहत्यांना किंग खानला भेटले आहेत. (Video Viral ) या इव्हेंटमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे.


या व्हिडीओमध्ये एक महिला किंग खानाला किस करत असल्याचे दिसून येत आहे. दुबईमधील इव्हेंटच्या व्हायरल व्हिडीओमध्ये किंग खान हा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसून आला आहे. या व्हिडीओत किंग खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि काही बॉडीगार्ड्स दिसून येत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला असे दिसून येत आहे की एक व्यक्ती किंग खानच्या हाताला किस करत आहे. त्यानंतर किंग खानसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

त्या गर्दीमधील एक महिला किंग खानच्या गालावर किस करत असल्याचे दिसून येत आहे. दुबईमधील या इव्हेंटच्या व्हायरल व्हिडीओला अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने तर किंग खानच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली आहे, ‘हे लोक लकी आहे, आम्ही तर भारतात राहून पण त्याला भेटू शकलो नाही.’ तर दुसऱ्या चाहत्यांनी देखील कमेंट केली आहे की, ‘एखाद्या फॅननं जर किस केलं, तरी किंग खान चिडत नाही.’ तर काही चाहत्यांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. किंग खान हा लवकरच जवान आणि डंकी या सिनेमामधून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

त्याच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. किंग खान हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांचं मनं जिंकत असतो. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम हे त्याचे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. तसेच गेल्या काही काही महिन्यापासून किंग खानचा पठाण हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात किंग खानसोबत दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्याबरोबर डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Exit mobile version