Fighter Movie : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. हा एरियल ॲक्शन चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या दमदार केमिस्ट्रीनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Virat Kohli : ज्याची भीती होती तेच झालं! विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून आऊट
नुकताच सिद्धार्थ आनंदच्या ब्लॉकबस्टर फायटरने आधीच 328 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हृतिक रोशन-दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट वीकेंडमध्ये 350 करोड चा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. एरियल ॲक्शन सीक्वेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या फायटरने केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच प्रभावी कामगिरी केली नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विजय मिळवला आहे.
Mumbai Police : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर पोलीस अलर्ट; शस्त्र परवान्यांची होणार तपासणी
चित्रपटाने आपला वेग कायम ठेवल्यामुळे फायटर या आगामी शनिवार व रविवार 350 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या अपेक्षा असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये जगभरात 300 कोटींचा आकडा पार करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. या सगळ्यामध्ये ‘फायटर’ची ओटीटी (OTT ) रिलीज डेटही आली आहे.
Manoj Jarange : “सरकारची भूमिका स्पष्ट नाही म्हणून मी”.. उपोषणाआधी जरांगेंचा सरकारला इशारा
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि Marflix Pictures & Viacom18 Studios निर्मित, Fighter मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट यशस्वीपणे कमाई करताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्सने हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत. सध्या या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. पण हा चित्रपट गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जाऊ शकतो. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही