Download App

डायनॅमिक फिल्ममेकर येणार एकत्र; मोझेझ अन् गुनीत करणार खास प्रोजेक्ट

Film Maker Moses Singh and Guneet Monga will together : इतिहास साक्षीदार आहे. जेव्हा दोन पॉवरपॅक चित्रपट निर्मात्यांनी ( Film Maker ) एकत्र काम केले तेव्हा त्यांनी रुपेरी पडद्यावर जादू निर्माण केली आहे. आता मोजेझ सिंग ( Moses Singh ) आणि गुनीत मोंगा ( Guneet Monga ) ही जोडी एकत्र काम करणार असल्याचं कळतंय.

>Rajkummar Rao: ‘श्रीकांत’साठी राष्ट्रीय पुरस्कार निश्चित? अभिनेता राजकुमार थेटच म्हणाला…

फरहान अख्तर-झोया अख्तर, करण जोहर-अयान मुखर्जी, सिद्धार्थ आनंद-आदित्य चोप्रा, एकता कपूर-रिया कपूर आणि इतर अनेक जोड्यानी आजवर एकत्र काम करून जादू निर्माण केली आहे. या सगळ्या जोड्यानी आजपर्यंत अनेक कल्ट क्लासिक चित्रपट बनवले आहेत. मोजेझ सिंग आणि गुनीत मोंगा हे जुबान नंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. “यो यो हनी सिंग : फेमस” हा नवा प्रोजेक्ट् हे दोघे सोबत करणार आहेत.

शाहंच्या सभेपूर्वी बच्चू कडूंचा ‘प्रहार’; पहिले आक्रमक झाले, नंतर पोलिसांच्या पाया पडले

मोझेझने याच दिग्दर्शन केले आहे आणि गुनीतने आगामी आणि बहुप्रतिक्षित डॉक्युमेंटरी चित्रपटाची निर्मिती केली आहे जी रॅपर यो यो हनी सिंगच्या जीवनातील एक आकर्षक झलक देणार असल्याचं वचन देते.मोझेज त्याचा कथाकथनासाठी आणि दूरदृष्टी कथनांसाठी ओळखला जातो. गुनीत मोंगा यांनी ‘द लंचबॉक्स’, ‘मसान’ आणि ऑस्कर-विजेता डॉक्युमेंटरी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ सारख्या प्रकल्पांसह सगळ्यांची मन जिंकली आहेत.

धक्कातंत्राची परिसीमा! भाषणावर प्रभावित झाले, टेबल बडवले त्याच खासदाराला मोदी-शाहंनी घरी बसवले

या बद्दल बोलताना मोझेझ म्हणतो, “गुनीतसोबत सहयोग करणे नेहमीच कमालीचं असत. तिचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण होणारी जादू ही कायम बघण्याजोग असते आणि आता आम्ही सोबत हा प्रोजेक्ट करतोय याचा आनंद आहे ”

डायनॅमिक जोडीने या अफलातून प्रोजेक्ट्ची सुरुवात केली असून त्यांच्या सहयोगी प्रकल्पाची सगळेच वाट बघत आहेत. ‘यो यो हनी सिंग: फेमस’ची रिलीज डेट अजून जाहीर व्हायची असून अनेक चाहते हा प्रोजेक्ट OTT वर येण्याची वाट पाहत आहेत.

follow us

वेब स्टोरीज