Karachi to Noida Movie : ऑनलाईन गेम खेळत असताना ओळख झाली आणि प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) तिचा बॉयफ्रेंड सचिन मीनाला (Sachin Meena) भेटण्यासाठी थेट देशात पोचणारी सीमाची प्रेमकहाणी (Love Story) गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आली आहे. आता या दोघांची ही लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या दोघांच्या प्रेम कहाणीवर एक सिनेमा बनवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. (film will be made on seema sachin over story name will be karachi to noida)
तसेच या सिनेमाच्या नावाची नोंदणी देखील करण्यात आली आहे. पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकहाणीवर आता सिनेमा बनवण्यात येणार आहे. या सिनेमाचे नाव देखील आता समोर आले आहे. दिग्दर्शक अमित जानी सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर सिनेमा बनवणार आहे. दिग्दर्शक अमित जानी यांनी याअगोदर सीमाला एका सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सीमा हैदरला ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ (A Tailor Murder Story) या सिनेमाची ऑफर देण्यात आली होती.
या सिनेमात सीमा रॉ एजंटची भूमिका साकारत असताना दिसून येणार आहे. तसेच पाकिस्तान मधून पळून भारतात बॉयफ्रेंड सचिन मीनाला भेटण्यासाठी अवैधरित्या पोहोचलेली सीमाच्या पासपोर्टची देखील पडताळणी अद्याप करण्यात आली नाही. तिची कागदपत्रे देखील पाकिस्तानातून परत आली नाही. अवैधरित्या भारतात पोहोचल्यामुळे सीमा हैदर प्रकरणामध्ये दहशतवादी अँगलचा तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे. असे राहून देखील सीमा हैदर आणि सचिन चांगलच प्रसिद्धीच्या झोतात असलयाचे पाहायला मिळत आहे.
Dharmaveer 2: प्रवीण तरडेंकडून जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेऊन ‘धर्मवीर 2’ ची घोषणा
सीमा हैदर आणि सचिन यांच्या सिनेमाचे नाव ‘कराची ते नोएडा’ असं ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाची नाव नोंदणी केली आहे. ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ सिनेमाचे निर्माते अमित जानी यांनी सीमा आणि अंजू यांच्या प्रेमकथेवर सिनेमा बनवण्याचं काम सध्या सुरू केलं आहे. सीमा हैदरवर लवकरच ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाचे थीम साँग देखील प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.