Four More Shots Please : प्राइम व्हिडिओने (Prime Video) आज घोषणा केली की, आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘फोर मोर शॉट्स प्लीज (Four More Shots Please) !’ चा बहुप्रतीक्षित अंतिम सिझन लवकरच प्रीमियर होणार आहे. प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सच्या निर्मितीमध्ये, रंगिता प्रितीश नंदी (Rangita Pritish Nandi) आणि इशिता प्रितीश नंदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही सिरीज, आजच्या स्त्रियांच्या आयुष्यातील चढ-उतार, नाती, स्वातंत्र्य आणि स्व-स्वीकृती यांचा जबरदस्त मिलाफ प्रेक्षकांसमोर मांडते.
शोचा बोल्ड दृष्टिकोन, जबरदस्त व्हिज्युअल स्टाइल आणि प्रेरणादायक कथाकथन यामुळे याला जागतिक स्तरावर भरभरून प्रेम मिळालं आहे. सिझन 4 आनंद, आत्मशोध आणि मैत्रीने परिपूर्ण आहे. यावेळी दमिनी, अंजना, सिद्धी आणि उमंग या समजून घेतील की, त्यांना दुसऱ्यांचे ‘नंबर वन’ बनण्याची गरज नाही, कारण त्या स्वतः त्यांच्या आयुष्यातील खऱ्या ‘हिरो’ आहेत. कारण आनंद ही केवळ एक लक्झरी नसून, तो जगण्याची एक जीवनशैली आहे. या सिझनमध्ये अधिक मस्ती, भरपूर शॉट्स, रिलेशनशिप्समधील गुंतागुंत आणि भावनिक गुंतवणूक पाहायला मिळणार आहे.
स्त्री स्वातंत्र्य, ओळख, आत्मनिर्भरता आणि आत्मियता यांसारख्या भावनांवर सखोलपणे प्रकाश टाकण्यात येणार आहे तेही शोच्या खास शैलीत, म्हणजे प्रामाणिकपणा, ग्लॅमर आणि जबरदस्त ह्यूमरसह. या वेळी काही नवीन चेहरेही शोमध्ये झळकणार आहेत, आणि शोची प्रसिद्ध ‘गर्ल्स ट्रिप्स’ प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांच्या प्रवासात सामील होण्यासाठी आकर्षित करतील. हे सगळं घेऊन येणार आहे दहा पट जास्त मस्ती, केमिस्ट्री आणि नाट्य.
मैत्री, प्रेम आणि स्वतःच्या स्वीकाराचा उत्सव साजरा करणाऱ्या या शोमुळे, ‘फोर मोर शॉट्स प्लीज!’ आजही प्रेरणादायक आणि उर्जेने भरलेली मालिका म्हणून ओळखली जाते. ही सिरीज प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय शोमध्ये अग्रस्थानी राहिली आहे. या धमाकेदार फिनाले सिझनमध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कलाकारांची तगडी टीम एकत्र येणार आहे.
कुदरत के बवंडर का…इशारा अब समझ लो! गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा
सायानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे, मानवी गगरू, यांच्यासह लीझा रे, प्रतीक बब्बर, राजीव सिद्धार्थ, अंकुर राठी आणि मिलिंद सोमन यांचाही सहभाग आहे. लेखन – देविका भगत, संवाद – इशिता मोईत्रा, तर दिग्दर्शन अरुणिमा शर्मा आणि नेहा पार्टी माटियानी यांनी केलं आहे. ‘फोर मोर शॉट्स प्लीज!’ सिझन 4 लवकरच प्राइम व्हिडिओवर केवळ आणि केवळ स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.