Download App

बॉलिवूडमध्ये खळबळ! शाहरुख खान, दीपिका पदुकोण विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Written By: Last Updated:

FIR filed against Shahrukh Khan, Deepika Padukone : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खा (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हुंडई मोटार कंपनीविरुद्ध (Hyundai Motor Company) दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशावरून या दोन्ही सेलिब्रेटींच्या नावाने एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला. राजस्थानच्या भरतपूर येथील वकील कीर्ती सिंह यांनी हुंडई कंपनीच्या सहा अधिकाऱ्यांसह या दोन्ही सुपरस्टार्सविरोधात तक्रार दाखल केली.

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 402 कोटी 90 लाखांच्या कर्जास मान्यता; राज्य सरकारचा मोठा निर्णय 

ही तक्रार हुंडईच्या ‘अल्काजार’ गाडीशी संबंधित असून ही कार कीर्ती सिंह यांनी 2024 मध्ये 24 लाख रुपयांना खरेदी केली होती.

सविस्तर वृत्त असं की, भरतपूर येथील कीर्ती सिंह यांनी हुंडई कार खरेदी केली होती. पण गाडी घेतल्यानतर काही दिवसांतच तिला तांत्रिक समस्या येऊ लागल्या. वारंवार तक्रारी करूनही कंपनीने योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. याबाबत कीर्ती सिंह यांनी सांगितलं की, गाडी खरेदी केल्यापासून त्यात अनेक तांत्रिक समस्या आल्या. गाडीच्या इंजिनमध्ये दोष असल्याने ती नीट चालत नव्हती. वेग वाढवताना आरपीएम वाढायचे, पण गाडीचा वेग वाढत नव्हता. यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धोका निर्माण झाला होता. कंपनीने वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी कायदेशीर कारवाईचा केली.

गृहकर्ज 25 वर्षांची परतफेड 10 वर्षात कशी करायची?, 35-40 लाखांचं व्याज कसं वाचवायचं? 

दरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार, मथुरा गेट पोलीस स्टेशनमध्ये शाहरुख, दीपिका आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात भादंवि कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

शाहरुख आणि दीपिका यांच्यावर गुन्हा का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर त्याचं कारण असं आहे की, कायद्यानुसार, ब्रँड ॲम्बेसेडर फक्त जाहिरातीचा चेहरा नसतात, तर उत्पादनात दोष आढळल्यास त्यांचीही जबाबदारी असते. शाहरुख खान १९९८ पासून हुंडईचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे आणि त्याने या कंपनीच्या अनेक कार मॉडेल्सची जाहिरात केली आहे. तर अलिकडेच डिसेंबर २०२३ मध्ये दीपिका पदुकोणची हुंदाईची नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण आता या घटनेमुळे त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, शाहरुख आणि दीपिकाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

 

follow us