Download App

किंग खानच्या ‘Jawan’ सिनेमाची क्लिप चोरीला; मुंबई पोलिसात एफआयआर दाखल, वाचा प्रकरण?

Shah Rukh Khan: बाॅलिवूड अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे हे वर्षे किंग खानसाठी अत्यंत खास राहिला आहे. किंग खानचे एक मागून एक असे सिनेमे चाहत्यांच्या सतत भेटीला येत आहेत. खार तर गेल्या काही दिवसांअगोदरच प्रदर्शित झालेला किंग खानचा ‘पठाण’ हा सिनेमा (Movie) धमाका करत असल्याचे पाहाय मिळाले होते, आणि याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट सिनेमा देखील ठरला.


किंग खानच्या सिनेमानं चाहते हे मोठ्या प्रमाणात प्रेम देत असल्याचे बघायला मिळत आहे. किंग खान याचा पठाण हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटल्याचे आपण पाहिले होते. परंतु प्रत्यक्षात सिनेमा प्रदर्शित झाला आणि धमाल केली. विशेष म्हणजे अनेकांनी अगोदर पठाण सिनेमावर बंदी घालण्याची थेट मागणी केली होती. परंतु किंग खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने ओपनिंग दिवशीच मोठा धमाका केला. आता किंग खान हा त्याच्या आगामी ‘जवान’ या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे.

खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंग खान हा आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कामध्ये असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच किंग खानने चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन देखील केले होते. नुकताच जवान सिनेमाबद्दल एक धक्कयाक माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘जवान’ सिनेमाचे काही व्हिडीओ आणि क्लिप व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहेत. यावर आता कायदेशीर पाऊल उचलण्यात आले आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटने जवान सिनेमाच्या काही क्लिप चोरी केल्या आणि ऑनलाइन लीक केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

https://letsupp.com/entertainment/sooraj-neverrekar-and-shivali-parab-paired-up-for-new-romantic-song-payal-waje-77593.html

या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट दिवशी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप रेड चिलीज एंटरटेनमेंटकडून करण्यात आला आहे. जवान सिनेमाचे व्हिडीओ किंवा क्लिप व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याअगोदर देखील जवान सिनेमाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे किंग खान याचा आता जवान सिनेमानंतर लगेचच डंकी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. किंग खान याचा आता जवान हा सिनेमा काय धमाका करतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us