Mumbai News : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग; काही कलाकार अडकले, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका हिंदी मालिकेच्या सेटला ही आग लागल्याचं कळत आहे. ‘गुम हैं किसी के प्यार में’ असं या मालिकेचं नाव आहे. काही कलाकार या आगीमध्ये अडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर काही कलाकारांना या आगीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान […]

Goregaon

Goregaon

मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका हिंदी मालिकेच्या सेटला ही आग लागल्याचं कळत आहे. ‘गुम हैं किसी के प्यार में’ असं या मालिकेचं नाव आहे. काही कलाकार या आगीमध्ये अडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर काही कलाकारांना या आगीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दुपारी 4 वाजेच्या दरम्यान ‘गुम हैं किसी के प्यार में’ या मलिकेचं शूटिंग सुरू असतानाच ही आगीची घटना घडली आहे. ही वाढच गेल्याने सेटच मोठं नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Pathan : रिलीज होऊन सहा आठवडे, यशराज फिल्म्सच्या पठानचा करिश्मा कायम !

त्याचबरोबर काही कलाकार आणि तंत्रज्ञ आत अडकल्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप देखील ही आग अटोक्यात आलेली नाही.

Exit mobile version