Salman Khan Firing Case: सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या (Firing Case) तपासात मुंबईची गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. (Mumbai Police) आता गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथील तापी नदीतून घटनेत आरोपींनी वापरलेली दुसरी बंदूकही जप्त करण्यात आली आहे. बंदुकीसोबतच पोलिसांना तीन मॅगझिनही सापडल्या आहेत.
दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही बंदुका जप्त
याप्रकरणी काल गुन्हे शाखेला अनेक जिवंत काडतुसांसह एक बंदूक सापडली असून दुसऱ्या बंदुकीचा शोध सुरू आहे. अखेर दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बंदुका जप्त केल्या आहेत.
तत्पूर्वी, सोमवार 22 एप्रिल रोजी, मुंबई गुन्हे शाखेने उघड केले की, वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 58 वर्षीय अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 राऊंड फायरिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी चौकशीदरम्यान सांगितले की, घटनेनंतर त्यांनी बंदुक सुरतच्या तापी नदीत फेकण्यात आली होती. मुंबई क्राईम ब्रँचने सांगितले की, “आरोपी विक्की गुप्ता याला सुरत तापी नदीवर नेण्यात आले, तिथे त्याने बंदूक फेकली.
अयोध्येनंतर बिग बीं यांनी अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी; किंमत वाचून भुवया उंचावतील
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
14 एप्रिलला पहाटे दोन दुचाकीस्वारांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर अभिनेत्याचे कुटुंब, बॉलीवूड इंडस्ट्री आणि चाहते त्याच्या सुरक्षेबाबत चिंतित झाले होते. नंतर एका मेलद्वारे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या घटनेची जबाबदारी घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी मुंबई पोलिसांनी दोन्ही दुचाकीस्वारांना गुजरातमधील कच्छमधून अटक केली.
#WATCH | Firing incident outside actor Salman Khan’s residence on April 14 | Mumbai Crime Branch recovers second gun used in the crime, from Tapi River in Surat, 3 magazines were also recovered along with the gun: Mumbai Crime Branch
(Source: Mumbai Police) pic.twitter.com/ig47SaroRi
— ANI (@ANI) April 23, 2024
सलमान खान वर्क फ्रंट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान लवकरच एआर मुरुगदास दिग्दर्शित त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय अभिनेत्याच्या सुपर-डुपर डीट चित्रपट ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलची स्क्रिप्टही तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर भाईजानच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.