Download App

मॅडॉक फिल्म्सकडून ‘तरस’ गाणं प्रदर्शित; अभिनेत्री शर्वरी वाघ धमाकेदार गाण्यात झळकणार

मॅडॉक फिल्म्सने चित्रपटातील पहिलं गाणं 'तरस' प्रदर्शित केलं, जो एक धमाकेदार डान्स ट्रॅक आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी दिसत आहे,

Image Credit: Letsupp

Actress Sharvari Wagh : मुंज्याच्या ट्रेलरला सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने चित्रपटातील पहिलं गाणं ‘तरस’ प्रदर्शित केलं आहे. ज्यामध्ये एक धमाकेदार डान्स ट्रॅक आहे. यात अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) दिसणार आहे. जिच्याबद्दल इंडस्ट्रीचे आता एक मत झालं आहे की ती बॉलिवूडची पुढची मोठी स्टार असेल. ‘तरस’ प्रदर्शित झाल्यानंतर शर्वरी कसा परफॉर्मन्स करेल याची उत्सुकता आहे.

 

शर्वरी म्हणते, ‘मी हिंदी चित्रपटात एक फीमेल लीड बनू इच्छित होते. एक गोष्ट जी मी नेहमीच करू इच्छित होते ती म्हणजे एक मोठ्या पडद्यावर डान्स. मला नेहमीच त्यांच आकर्षण वाटलं आहे. मी हिंदी सिनेमाच्या महत्वाच्या अभिनेत्रींच्या गाण्यांची फॅन राहिलेली आहे. ज्यांनी मोठे चार्टबस्टर्स गाणं गायले आहेत, ज्यावर संपूर्ण देश नाचला आहे असही ती म्हणाली आहे.

 

ती पुढे म्हणते, सिनेमास शोबिज म्हटले जाते आणि गाणी आणि डान्स नंबर लोकांसाठी हे ठरवण्यासाठी महत्त्वाचं साधन असतात की, ते चित्रपट पाहणार आहेत की नाही. हे पार्टी ट्रॅक वेळोवेळी त्या कलाकारांनाही ओळख आणि मान्यता दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या सादरीकरणामध्ये एक लय साधली आहे. मी फक्त अभिनेत्री किंवा डान्सिंग आयकॉनला मोठे डान्स नंबर मिळालेले पाहिले आहेत. कारण त्यांच्यात लोकांचे लक्ष वेधण्याची क्षमता आणि लोकप्रियता आहे.

 

ती म्हणते, ‘मी फक्त एक चित्रपटाची अनुभवी आहे. परंतु, माझे निर्माता दिनेश विजान माझ्यावर एवढा विश्वास दाखवला असून माझ्यासाठी इतका मोठा डान्स ट्रॅक तयार करत, माझ्या खांद्यावर मोठी शाबासकी दिली आहे. त्यामुळे मी हे करू शकते. माझ्या खात्यात एक हिट डान्स सॉन्ग आहे. तसंच, मला ‘तरस’ च्या प्रत्येक गोष्टीची शूटिंग करायला आवडल असही ती म्हणाली.

 

दिनेश विजान प्रस्तुत, मुंज्या चे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान आणि अमर कौशिक यांनी केली आहे.  तो ७ जून २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

 

follow us

वेब स्टोरीज