Aath Hode Dhingana Fourth Season : आता होऊ दे धिंगाणाच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ मनोरंजनाचे क्षण घेऊन येणारा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापलीकडेही आवडीने पाहिला जातो. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम चौपट मजा आणि चौपट धमाल घेऊन पुन्हा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झालाय. 9 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता आता होऊ दे धिंगाणाचं चौथं पर्व (Aath Hode Dhingana Fourth Season) सुरु होत आहे. प्रत्येत पर्वात प्रेक्षकांना काहीतरी नवं देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न असतो.
चौथ्या पर्वात प्रेक्षकांना थीमपार्कची जादू अनुभवता येणार आहे. थीमपार्कमध्ये ज्याप्रमाणे अद्भूत आणि अविश्वसनीय गोष्टींची सफर घडते अगदी त्याप्रमाणेच धिंगाणाचा मंच भन्नाट गेम्सच्या माध्यमातून मनोरंजनाची धमाल सफर घडवणार आहे. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या स्मायली काय गायली, धुऊन टाक, गोरी गोरी पान गाते किती छान या सुपरहिट फेऱ्या नव्या ट्विस्टसोबत या पर्वातही असणार आहेत. याच्या सोबतीला अनेक नव्या अतरंगी फेऱ्या देखिल पाहायला मिळतील.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं भव्यदिव्य रुप या पर्वाचं प्रमुख आकर्षण ठरेल. एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. चौथ्या पर्वाविषयी सांगताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, ‘तुमचा कार्यक्रम कधी बंद होणार यापेक्षा तुमचा कार्यक्रम कधी सुरु होतोय याची जेव्हा प्रेक्षकांकडून विचारणा होते तेव्हा तेच त्या कार्यक्रमाचं यश असतं. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की इतकं यश आता होऊ दे धिंगाणाला मिळेल. या कार्यक्रमाचा चौथा सीझन करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय. याचं श्रेय स्टार प्रवाह वाहिनी आणि आता होऊ दे धिंगाणाच्या संपूर्ण टीमला जातंय. प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पहात होतो. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच भेटीला येतोय. आता होऊ दे धिंगाणा म्हणजे 100% मनोरंजनाची हमी. नव्या जोशात आणि नव्या ढंगात चौथं पर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. अश्या शब्दात सिद्धार्थ जाधवने आपली भावना व्यक्त केली.’
रोमांचक सामना, इंग्लंडचा विजय पण चर्चा सौरव गांगुलीची…, लॉर्ड्स कसोटीत नेमकं घडलं तरी काय?
स्टार प्रवाहच्या परिवारातल्या कलाकार मंडळींसोबत यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे. दोन मालिकांच्या टीममधली सांगितीक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गंमती-जंमतीही या मंचावर उलगडतील. तेव्हा सिद्धार्थ जाधवचा सळसळता उत्साह आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर आता होऊ दे धिंगाणाचं चौथं पर्व पाहायलाच हवं. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहचा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा 4’ 9 ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.