FWICE bans Ranveer Singh after ‘Don 3’ controversy Also demands compensation of Rs 45 crores : ‘डॉन 3’मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह यांच्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने बंदी घातल्याची मोठी बातमी समोर आली आहे. फरहान अख्तर यांच्या ‘डॉन 3’ चित्रपटातून रणवीर यांनी अचानक माघार घेतल्याच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला. मागील आठवड्यात झालेल्या अंतर्गत बैठकीनंतर सोमवारी पत्रकार परिषदेत FWICE ने ही घोषणा केली.
जागावाटपावरून एकनाथ शिंदे नाराज; CM फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय, दोन नेत्यांवर महत्वाची जबाबदारी
मिळालेल्या माहितीनुसार, FWICE ने रणवीर सिंह यांच्याविरोधात असहकाराचा आदेश जारी केला आहे. म्हणजेच, जोपर्यंत ‘डॉन 3’ वाद मिटत नाही, तोपर्यंत संघटनेच्या सदस्यांना त्यांच्यासोबत काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर मोठा खर्च झाल्यामुळे सुमारे 45 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे.
रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सर होतो? तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर…
हा वाद एप्रिलमध्ये एक्सेल एन्टरटेन्मेंट यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सुरू झाला. रणवीर यांनी तीन चित्रपटांचा करार केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्यांनी प्रकल्प सोडल्याने निर्मात्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागल्याचं म्हटलं जात आहे. FWICE ने या प्रकाराला हिंदी चित्रपटसृष्टीसाठी गंभीर मुद्दा म्हटलं आहे. शूटिंग सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी कलाकारांनी चित्रपट सोडल्यामुळे निर्माते, तंत्रज्ञ आणि शेकडो कामगारांचे नुकसान होत असल्याचं संघटनेचं मत आहे.
पाकिस्तान देणार इस्त्रायलला मान्यता; डोनाल्ड ट्रम्प यांची नवी अट काय?
FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. “शूटिंगच्या दहा दिवस आधी प्रोजेक्ट सोडणं चुकीचं आहे. उद्योगाचं नुकसान होऊ देणार नाही,” असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, फरहान अख्तर यांनीही चित्रपटाबाबतची अनिश्चितता मान्य केली आहे. ‘डॉन 3’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. याआधी 2011 मध्ये आलेल्या ‘डॉन 2’मध्ये शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा प्रमुख भूमिकेत होते.
