Download App

Sunny Deol : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलच्या ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘गदर 2’ हा 2001 ला आलेल्या आणि अत्यंत सुपरहीट ठरलेल्या ‘गदर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातून अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल हीची मुख्य भूमिका होती. तर या चित्रपटात देश भक्ती बरोबरच एक प्रेमकथा होती.

आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज देखील या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना अभिनेता सनी देओल म्हणाला की, ‘ गदर – एक प्रेम कथा’ हा माझ्या आयुष्याचा, वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या एक महत्त्वाचा भाग आहे. गदरमधला तारा सिंग हा केवळ एक नायक नाही. तर तो एक कल्ट आयकॉन बनला ज्याने सर्व अडचणींना झुगारून दिले आणि आपल्या कुटुंबासाठी आणि प्रेमासाठी सर्व सीमा ओलांडल्या. 22 वर्षांनंतर या सर्व टीमसोबत काम करणे हा एक समृद्ध करणारा अनुभव होता.

या चित्रपटाचं काही सीन्सच चित्रीकरण अहमदनगर शहरात करण्यात आले आहे. या चित्रपटाला दिग्दर्शक आणि निर्मिते अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. तर हा चित्रपट झी स्टुडिओजने निर्मीती केली आहे. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल आणि उत्कर्षा शर्मा हीची मुख्य भूमिका आहे. तर हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 ला रिलीज होणार आहे.

Tags

follow us