Download App

Box Office Collection: ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन; कोण हिट कोण फ्लॉप..? लगेच जाणून घ्या…

Box Office Collection : सनी पाजी यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) आणि बॉलिवूडचा खिलाडीचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) या चाहत्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका केला आहे. हे सीक्वेलचे सिनेमे बघायला देखील चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला कमवत असल्याचे बघायला मिळत आहे. अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ (Ghoomer) सिनेमा बघायला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.

‘गदर 2’ हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शितच्या पहिल्या दिवशी ४०.१ कोटींची मोठी कमाई करत या सिनेमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रदर्शितच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सिनेमाने २८४.६३ कोटींचा गल्ला कमावला आहे. प्रदर्शितच्या ११ दिवसामध्ये या सिनेमाने ३८९.१० कोटींची कमाई झाली. ‘ओएमजी 2’ या सिनेमाने देखील प्रदर्शितच्या पहिल्या आठवड्यामध्ये ८५.०५ कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने ११७.२७ कोटींचे कलेक्शन केले आहे.


‘ओएमजी 2’ हा सिनेमा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. प्रदर्शितच्या सुरुवातीला या सिनेमाने जोरदार कामगिरी केली असली तरी नंतर मात्र हा सिनेमा थोडासा थंडावल्याचे बघायला मिळत आहे. थलायवाचा ‘जेलर’ हा सिनेमा १० ऑगस्ट २०२३ दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. थलायवाचाच्या अनेक सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली असते, आणि त्याचे सिनेमे चाहते डोक्यावर घेत असतात. प्रदर्शितच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सिनेमाने २३५.८५ कोटींचा गल्ला कमावला आहे.

Box Office Collection: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून थलायवा, सनी पाजी अन् अभिषेक बच्चन भारावले!

देशात या सिनेमाने २८८.६० कोटींची कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने ५०७.४ कोटींची कमाई केली आहे. थलायवा गेल्या काही वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ देखील कायम आहे. तसेच सध्या अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा ‘घूमर’ हा सिनेमा क्रिकेटप्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे, तरी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा थोडासा कमी पडत असल्याचे बघायला मिळत आहे. देशात या सिनेमाने फक्त ३.७९ कोटींची मोठी कमाई केली आहे. तर जगभरात ४.१ कोटींचा गल्ला कमावला आहे. अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटल्याचे दिसत  आहे.

Tags

follow us