अहमदनगरमध्ये सनी देओलच्या गदर-2 चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ…

अहमदनगर : बॉलिवूड अभिनेते सनी देओलच्या गदर-2 चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात करण्यात येणार आहे. बुधवारी या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली. ‘सनी देओल यांची भेट घेतली व चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभेतील आमच्या विविध […]

Gadar

Gadar

अहमदनगर : बॉलिवूड अभिनेते सनी देओलच्या गदर-2 चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात करण्यात येणार आहे. बुधवारी या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला.

याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली. ‘सनी देओल यांची भेट घेतली व चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभेतील आमच्या विविध आठवणींना देखील उजाळा दिला.’

‘तसेच शूटिंगसाठी अहमदनगरची निवड केल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले व चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.’

‘या चित्रपट क्रु च्या राहण्याच्या व जेवणाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील उद्योगाला एक व्यावसायिक आधार मिळालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अनेक चित्रपट प्रेमी देखील अहमदनगरकडे वळण घेतील व जिल्ह्याच्या पर्यटनास एक वेगळी वाटचाल मिळेल अशी अपेक्षा आहे.’ अशी आपेक्षा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version