Download App

Gadar 2 Trailer: बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गदर 2’ चा ट्रेलर प्रदर्शित

Gadar 2 Trailer: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चा ट्रेलर मोठ्या धडाक्यात रिलीज झाला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. आता आज संध्याकाळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

मुंबईत एका शानदार कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी सनी देओल आणि अमिषा पटेल हे देसी लूकमध्ये पाहायला मिळाले. तारा सिंहची दमदार अ‍ॅक्शन पुन्हा एकदा ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली.

विधान परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा ! गोऱ्हे व पडळकरांमध्ये जोरदार खडाजंगी, नेमकी काय घडलं ?

ट्रेलरमध्ये केवळ सनी देओलच नाही तर त्याच्या मुलगाही जबरदस्त अ‍ॅक्शनमध्ये दिसून येतोय. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 3 मिनिटे आणि 2 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तारा सिंगचा मुलगा जिते पाकिस्तानच्या भूमीवर कैद होतो आणि त्याला सोडवण्यासाठी तारा सिंग पाकिस्तानमध्ये पोहोचतो. तिथून तो आपल्या मुलाला कसा बाहेर काढतो हे या चित्रपटामध्ये दिसणार आहे. गदर 2 प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन देणार आहे हे ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Tags

follow us