Download App

Gashmeer Mahajani: वडिलांच्या निधनानंतर केस न कापण्याबद्दल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, म्हणाला…

Gashmeer Mahajani Post: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं जुलै महिन्यामध्ये निधन झालं. पुण्यतील आंबी गावातील राहत्या घरात कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं होतं. (Social media) ते कुटुंबापासून वेगळे एकटेच तिथे राहायचे, तसेच शेजारच्यांशी त्यांचा संपर्क नव्हता. त्यामुळे त्यांच्या निधनाविषयी फार उशिरा माहिती समोर आली होती. रवींद्र महाजनी यांच्या निधनाची जोरदार चर्चा देखील झाली.

Gashmeer Mahajani Post

रवींद्र महाजनींचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनानंतर होत असलेल्या जोरदार टीकेला सामोरं जावं लागलं आहे. गश्मीर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवतो. या सेशनच्या माध्यमातून तो चाहत्यांनी केलेल्या सवालांची सडेतोड उत्तरं देत असतो. शुक्रवारी त्याने पुन्हा एकदा चाहत्यांच्या सवालावर सडेतोड उत्तरं दिल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी त्याला एका युजरने वडिलांच्या निधनानंतर केस न कापण्याविषयी सवाल केला होता. यावर गश्मीर नेमकं काय म्हणाला?

यावर एका युजर म्हणाला की “वडील वारल्यावर केस कापत असतात, याबद्दल काय बोलाल? मला तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल”, असा सवाल युजरने विचारला होता. त्यावर गश्मीर म्हणाला आहे की, “मी जे कार्य करतो, त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थार्जन होते. टक्कल केलं असतं तर माझ्या हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?”


यावेळी एका चाहत्याने कुणाच्याही यशामागे आणि अपयशाच्या पाठीमागे नेमकं काय कारण असतं, असा सवाल विचारला त्यावर गश्मीरने कठोर परिश्रम आणि आळशीपणा असं उत्तर दिल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us