Gashmir Mahajani: चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर थेटच म्हणाला, “मी माझ्या…”

Gashmir Mahajani: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani Death) यांच्या निधनाला २ आठवडेहोऊन गेले आहेत. १५ जुलै रोजी ते पुण्यातील तळेगाव दाभादे येथील आंबी गावात राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या निधनाविषयी देखील कुणालाच माहित नव्हते. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला (Gashmir Mahajani) देखील पोलिसांनी कळवलं होतं. त्यानंतर तो त्याठिकाणी आला होता. वडिलांच्या निधनाला […]

Gashmir Mahajani

Gashmir Mahajani

Gashmir Mahajani: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani Death) यांच्या निधनाला २ आठवडेहोऊन गेले आहेत. १५ जुलै रोजी ते पुण्यातील तळेगाव दाभादे येथील आंबी गावात राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या निधनाविषयी देखील कुणालाच माहित नव्हते. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला (Gashmir Mahajani) देखील पोलिसांनी कळवलं होतं. त्यानंतर तो त्याठिकाणी आला होता.

gashmeer mahajani post

वडिलांच्या निधनाला १५ दिवस होऊन गेले आहेत. तेव्हापासून गश्मीर हा फार सोशल मीडियावर (Social media) दिसून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गश्मीर इन्स्टाग्राम स्टोरीच्या (Instagram story) माध्यमातून अनेकदा चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. वडिलांच्या निधनानंतर त्याने पहिल्यांदाच चाहत्यांशी संवाद साधला. त्यामध्ये त्याने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती.

त्यानंतर रविवारी (३० जुलै) दिवशी त्याने ‘आस्क मी अ क्वेश्चन’ हे सेशन ठेवल्याचे दिसून आले होते. त्यामध्ये त्याने चाहत्यांच्या काही सवालांची उत्तरे देखील दिल्याचे पाहायला मिळाले आहे. यावर एका चाहत्याने गश्मीरला विचारले आहे की ‘असे काही शब्द जे तू तुझ्या वडिलांना सांगू शकणार आहेस का? यावर गश्मीरने थेटच उत्तर दिलं आहे की, “जे मी माझ्या वडिलांना सांगू शकत नाही, ते तुम्हाला का सांगू?” असं उत्तर गश्मीरने यावेळी चाहत्यांना दिले आहे.

https://letsupp.com/entertainment/siddharth-jadhav-new-marathi-movie-73686.html

तसेच या कठीण प्रसंगातून कुटुंब सावरत असल्याचे गश्मीरने यावेळी सांगितले आहे. आणि ट्रोलिंग करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील तो म्हणाला आहे. यावेळी चाहत्यांनी आपल्याला तुझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत गश्मीरला पाठिंबा देखील दर्शविला आहे.

Exit mobile version