Download App

Gashmir Mahajani: गश्मीर महाजनी पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत झळकणार; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Gashmir Mahajani: मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी बाबांच्या निधनानंतर गेल्या काही दिवस मोठ्या पडद्यावरून लांब होता. परंतु आता तो लवकरच एका नव्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याने स्वतःच याबद्दल माहिती दिली आहे. (Social media) तो एका ऐतिहासिक भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. परंतु तो कोणती भूमिका साकरणार आहे, याविषयी त्याने अद्याप काही देखील सांगितलेलं नाही.


गश्मीरने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे की, “पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …” असं कॅप्शन देत गश्मीरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ (Video) त्याच्या अनेक वेगवेगळ्या फोटोंचा कोलाज करून बनविण्यात आला आहे. गश्मीरने एक व्हिडीओ शेअर केला आहे, परंतु सिनेमाचं नाव काय असेल किंवा तो नेमकी कोणती भूमिका साकारणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

गश्मीरने ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमांत छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारली होती. यानंतर आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. ही भूमिका कोणती असेल, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागल्याची बघायला मिळत आहे. गश्मीरने हा व्हिडीओ शेअर केल्यावर इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या काही सवालांची उत्तरं दिल्याचे दिसत आहे. यावेळी चाहत्यांनी त्याला शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेस का? की त्यांच्या मावळ्यांच्या भूमिकेत दिसशील असं यावेळी त्याला सवाल विचारलं आहे.

Sai Tamhankar: सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर; पोस्ट शेअर करत म्हणाली…

चाहत्याच्या सवालांना उत्तर देत असताना गश्मीर म्हणाला आहे की, “त्या काळातील मोठा साहसपट करत आहे एवढंच. बाकी माहिती योग्य वेळी आल्यावर देईन. अगोदरच कधीच झाला नाही, असा हा सिनेमा असणार आहे आणि त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,” असं गश्मीरने यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us