Gauri Khan: काल बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) हिला ईडीकडून (ED) नोटीस मिळाल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती.या वृत्तात गौरी हिच्यावर एका रिअल इस्टेट कंपनीला 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याचे आहे. या प्रकरणाबद्दल स्वतः ईडीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गौरीला नोटीस मिळाली नाही
अंमलबजावणी संचालनालयाने हे वृत्त खोटे ठरवले आणि गौरी विरोधात कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नसल्याची पुष्टी केली. तसेच परवानगी घेण्यासाठी कोणतीही तयारी केली जात नाही. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. गौरींवर कारवाई करण्याची कोणतीही तयारी केली जात नाही.
नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्टनूसार, शाहरूखची पत्नी गौरी खान लखनऊ येथील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. दिल्लीतील सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक मोठा प्रोजेक्ट असून या प्रोजेक्टमधून मुंबईचे किरीट जसवंत शहा या व्यक्तीला 2015 रोजी 85 लाख रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला होता. परंतु, कंपनीने जसवंत यांना हा फ्लॅट खरेदी करून दिला नाही. किंवा त्याचे 85 लाख रूपयेही परत केले नाहीत.
किरीट जसवंत शहा याने कंपनीच्या विरोधात म्हणजे, तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर दिल्लीतील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गौरीला ईडीने नोटीस पाठविली आहे.
शाहरुखची पत्नी गौरीकडून 30 कोटींचा गंडा? ईडीने धाडली नोटीस
दरम्यान, मार्च 2023 मध्ये शहा यांनी या तिघांविरुद्ध एफआयआरही दाखल केला होता. तक्रारीत शहा यांनी आरोप केला आहे की, मी त्याच वर्षी सुशांत गोल्फ सिटी येथील कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या संचालकांना भेटले आणि 86 लाख रुपये किमतीचा फ्लॅट घेण्याचे मान्य केले. मला 2016 मध्ये फ्लॅटचा ताबा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले, पण तेव्हापासून नंतर बराच वेळ गेला आणि मला फ्लॅट मिळालेला नाही. नंतर मला कळले की मी बुक केलेल्या फ्लॅटचा करार कंपनीने दुसऱ्या कोणाला तरी हस्तांतरित केला असल्याचं शहा यांनी म्हटलंयं.