Gautam Joglekar Video post: ‘रमा राघव’ (Rama Raghav) ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका (Marathi Serial ) असून या मालिकेतील रमा आणि राघव यांची लव्हस्टोरीही (love story) तितिकीच जोरदार चर्चेत आहे. (Social media) सध्या या जोडीच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू असताना, रमाच्या वडिलांची भूमिका करणारे नट बदल्ल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली.
या मालिकेतील गिरीश परांजपे (Girish Paranjape) म्हणजेच रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर यांनी वैद्यकीय कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला असं कळतंय. रमा राघवच्या ऑफिशियल पेजवर एक व्हिडीओ पोस्ट झाला आहे, ज्यात गौतम जोगळेकर यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सविस्तर कारण सांगितले आहे. तर त्यांच्या जागी आता गिरीश परांजपेंच्या भूमिकेत श्रीरंग देशमुख पाहायला मिळता आहेत. श्रीरंग देशमुख आणि गौतम जोगळेकर हे चांगले मित्र आहेत.
या व्हिडीओमधून कारण स्पष्ट होते की, गौतम जोगळेकरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याची सर्जरी करायची असल्याने त्यांना मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला. गिरीश परांजपे या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले. तसेच आता रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे श्रीरंग देशमुख हे त्यांचे मित्र असून त्यांनाही तितकंच प्रेम द्या असं प्रेक्षकांना आवाहन केले आहे.
Shyamchi Aai: बहुप्रतीक्षित‘श्यामची आई’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित
याआधी ‘रमा राघव’ या मालिकेत पूजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अर्चना निपाणकरने मालिकेला रामराम ठोकला आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. “आतापर्यंत तुम्ही मला ‘रमा राघव’ मालिकेत पूजाची भूमिका साकारताना पाहत होता. तुम्ही सगळ्यांनीच या भूमिकेवर प्रेम केले. माझ्या कामाच खूप कौतुक केले. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. पण दुर्दैवाने माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही मालिका सोडावी लागते आहे. अर्थात या सगळ्यात कलर्स मराठीची टीम, माझे प्रोडक्शन क्रिएटीव्ह ट्रान्समीडिया आणि माझ्या मालिकेची संपूर्ण टीम या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केले.