Download App

Gautami Patil ‘या’ चित्रपटात झळकणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Gautami Patils Upcoming Movie : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे.

दरम्यान आता गौतमी पाटील ही चित्रपटात देखील झळकणार आहे. तिच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला गेली आहे. गौतमी कोणत्या चित्रपटात दिसणार, कोणती भूमिका साकारणार याबद्दल विचारणा केली जात आहे. दरम्यान अहमदनगर येथे गौतमीने या चित्रपटाबद्दल बोलताना माहिती दिली आहे की, घुंगरू चित्रपट या चित्रपटात ती काम करणार आहे.

Gautami Patil : ‘का उगा घाई अशी…?’ म्हणत बैलासमोर गौतमीची लावणी

या चित्रपटात आपण अंतरा ही भूमिका साकारणार असून हा चित्रपट कलांकारांच्या संदर्भातच असल्याचंही यावेळी तिने सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या नृत्यांच्या अदा तिच्या चाहत्यांना आता पडद्यावर पाहायाला मिळणार एवढं नक्की. त्यामुळे हा चित्रपटा कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर यावेळी माझा प्रदशिर्त होणार घुंगरू चित्रपट सर्वांनी पहावा. असे आवाहन गौतमी पाटील यांनी केले आहे.

मात्र या दरम्यान गौतमीने एका सामाजिक कामात आपला सहभाग नोंदवलाय. तिने अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे लहुजी समाज सेवा मंडळाच्या वतीने मागासर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी निधी गोळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलयं. त्यात तिने आपलं योगदान दिलं आहे. यावेळी तिने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल देखील माहिती दिली आहे.

Tags

follow us