Ghar Banduk Biryani Movie: “आता चालंच बिघडवायचीय..” अशी टॅगलाईन जरी असली तरी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे (sayaji shinde) यांच्या अभिनयाने समृद्ध असा ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani ) या चित्रपटासाठी चाहत्यांची चाल सिनेमागृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरला आहे असं छातीठोकपणे म्हणता येऊ शकणार नाही.
सध्या ३० सेकंदाच्या मनोरंजनाच्या दुनियेत तब्बल पावणे तीन तासांसाठी प्रेक्षकांना एकाच जागी बसवून ठेवणं हे सोप्पं काम नव्हे. सयाजी शिंदे नाव फक्त मराठी चित्रपटसृष्टीपुरत मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी हिंदीप्रमाणे अनेक दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम केलं आहे. सध्या ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आले आहेत.
त्यांनी दिलेल्या लेट्सअपच्या मुलाखतीत सांगितले आहे की, मी काय केलंय, किती केलंय त्यापेक्षा मी काही अंतर सरळ मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितले, माझ्या बरोबरचे मित्र हे जागेवरच फिरत राहिले. आपल्या मित्रांप्रमाणे आपणही ग्रजवेट झालो, नोकरीला लागलो आणि आयुष्य संपत आले की, रिटायर झालो, आणि आता घरी बसलो, अशीच लाईफ माझीही झाली असती.
मी पण वॉचमन होतो, मी ही रिटायरमेंट झालो असतो, हे तर नक्कीच की जो सयाजी शिंदे होता. त्यांनी काहीतरी स्वप्न बघितली, आणि सरळ रस्त्यांनी पुढे गेला आणि एखाद्या चांगल्या टप्प्यावरती पोहचला, इथं जो होता तोच आहे, आता जो आहे तो ही तोच आहे. म्हणून ते म्हणतात की आता कुठे सुरुवात झाली, उद्याचा दिवस नव्याने सुरु करू इतकं साध असलयाचे यावेळी ते म्हणाले.