‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमा सुपरहिट होणार; निर्मात्यांनी सांगितले त्यामागील कारण

Ghar Banduk Biryani Movie :  अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर महत्वाच्या  भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळे व झी स्टुडिओजचे बिझनेस हेड यांच्याशी  आमचे लेट्सअपचे सीईओ अमित भंडारी यांनी खास बातचीत केली […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T190643.619

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 08T190643.619

Ghar Banduk Biryani Movie :  अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर महत्वाच्या  भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळे व झी स्टुडिओजचे बिझनेस हेड यांच्याशी  आमचे लेट्सअपचे सीईओ अमित भंडारी यांनी खास बातचीत केली आहे.

यावेळी त्यांनी ‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमाच्या निर्मिती मागीची गोष्ट सांगितली. कोविडच्या आधी काय किंवा नंतर काय जोपर्यंत तुम्ही एखाद्या सिनेमाचे खास सरप्राईज  ठेवत नाही तोपर्यंत त्यात ‘झी’चे असे काही असत नाही. झीकडून लोकांना खास अपेक्षा असतात. आत्तापर्यंतच्या झीच्या सिनेमांची ती खासियत राहिलेली आहे. त्यामुळेच लोकांना झीचे सिनेमे आवडतात, असे मंगेश कुलकर्णी म्हणाले आहेत. ज्यावेळी एखादी मुळ गोष्ट चांगली असते तेव्हा निश्चितच झी त्याच्यामध्ये सहभाग घेते व ती गोष्ट आणखी कशी चांगली होईल, याचा विचार करते, असेही त्यांनी सांगितले आहे.

हा सिनेमा सगळीकडे पोहोचणार याची आम्हाला खात्री आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्हाला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. अनेक गावातून आम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही आमच्याकडे प्रमोशनसाठी या, असे कुलकर्णी यांनी सांगतले आहे. हा सिनेमा इतर भारतीय भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. त्याविषयीदेखील त्यांनी माहिती दिली आहे. मराठी सिनेमाचा विषय हा खुप वेगळा असतो. त्यामुळे सर्व लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले आहेत.

‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट आणखी…” नागराज मंजुळेंनी केला मोठा खुलासा

दरम्यान, नागराज मंंजुळे यांनी देखील या सिनेमाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नागराज मंजुळे म्हणाले,”झुंड’, ‘घर बंदूक बिरयानी’ नंतर अशा आणखी एका मराठी सिनेमात झळकणार आहे. ‘फ्रेम’ असं या सिनेमाचे नाव असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितल आहे. या सिनेमात अमेय वाघबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजवर अनेक सिनेमामध्ये त्यांनी छोटी- मोठी भूमिका साकारली आहेत.

Exit mobile version