Download App

आता युट्यूबवर पाहता येणार मूळ घाशीराम कोतवाल

मुंबई : घाशीराम कोतवाल हे मूळ नाटक आता युट्यूबवर उपलब्ध झालं आहे. मात्र युट्यूबवर हे माटक फक्त ३ दिवस पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्वरा करून हे नाटक पाहाव लागणार आहे. या संदर्भात संगीत नाटक अकादमी या युट्यूब चॅनेलवर माहिती देण्यात आली आहे. तर याच युट्यूब चॅनेलवर ते पाहता येणार आहे.

मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर आपले वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या घाशीराम कोतवाल या नाटकाला पन्नास वर्षे होत आहेत. त्यामुळे संगीत नाटक अकादमीतर्फे मूळ संचातील नाटकाचे दुर्मीळ चित्रीकरण युट्यूबवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पन्नास वर्षेंपूर्वी नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग थिएटर ॲकॅडमी या संस्थेतर्फे १६ डिसेंबर १९७२ रोजी सादर करण्यात आला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी हे नाटक दिग्दर्शित केले होते.

Tags

follow us