Download App

व्हिसासाठी आलेल्या कार्तिक आर्यनच्या मामा-मामीनेही Ghatkopar Hoarding Collapse मध्ये गमावला जीव

Ghatkopar Hoarding Collapse बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा-मामी यांनी देखील या दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावला आहे.

Ghatkopar Hoarding Collapse Kartik Aaryan Mama Mami dead : मुंबईतील घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्याच्या वेगाने (Ghatkopar Hoarding Collapse) होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. त्यानंतर यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे ( Kartik Aaryan ) मामा-मामी यांनी देखील या दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावला आहे.

Pm Narendra Modi पत्रकार परिषद का घेत नाहीत? म्हणाले, माध्यम पूर्वीसारखे..,

कार्तिक आर्यनचे मामा मनोज चांसोरिया हे मुंबईतील विमानतळाचे माजी संचालक होते. तर त्यांच्या पत्नीचे नाव अनिता चांसोरिया असं होतं. वर्षभरापूर्वीच ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर पत्नीसह ते जबलपूरला राहत होते. मात्र व्हिसाशी संबंधित कामानिमित्त हे दोघे पती-पत्नी मुंबईला कारणे आले होते. त्यांचा मुलगा यश हा अमेरिकेमध्ये राहतो. त्यासाठीच त्यांना अमेरिकेमध्ये जायचे होते. त्यामुळे ते व्हिसा काढण्यासाठी मुंबईला आले होते. अशी माहिती समोर आली आहे. मात्र मुंबईहून जबलपूरला परतत असताना या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले आणि त्याचवेळी हे होर्डिंग कोसळून त्यांनी आपला जीव गमावला.

तीन दिवसांनी पटली मृतदेहांची ओळख

दरम्यान चांसोरिया दाम्पत्याने या दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावल्यानंतर तब्बल तीन दिवसांची त्यांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. कारण ही दुर्घटना घडली. त्या दिवशीपासून त्यांचा फोन लागत नव्हता. त्यांचा मुलगा यश त्यांना अमेरिकेतून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याने मुंबईतील आपल्या मित्रांना आपल्या आई-वडिलांचा तपास करण्यास सांगितले. तेव्हा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली. तर पोलिसांनी या दाम्पत्याचे फोन ट्रॅक केले असता त्यांच्या फोनचे शेवटचे लोकेशन या होर्डिंग दुर्घटनेच्या ठिकाणी मिळाले.

माझा विशालला शब्द, खासदारकीला आडवा येणार नाही’; ‘सांगली’साठी नकाराचं कारण कदमांनी सांगितलंच..

ही माहिती मिळताच त्यांच्या मुलाने मुंबई गाठली. तीन दिवस उलटून गेल्याने या दाम्पत्याची ओळख पटत नव्हती. मात्र मुलाने अंगठीवरून ओळख पटवली. त्यानंतर त्यांच्यावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता कार्तिक आर्यन देखील या घटनेदरम्यान आपल्या मामेभावासोबत होता. अशी देखील सांगण्यात येत आहे.

होर्डींग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक…

घाटकोपर दुर्घघटनेतील आरोपी भावेश प्रभुदास भिंडे (51) हा अटकेच्या भीतीने पळून गेला होता. मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या मुलुंड येथील घरी पोहोचले होते. मात्र तो पसार झाला होता. पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा असल्याचं समजलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांचे सात पथक लोणावळ्याला पोहोचले. मात्र त्यापूर्वीच भिंडेने मोबाईल बंद केला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, भावेश भिंडे याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे, त्याला उदयपूर येथून अटक करण्यात आली. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये रूम बुक केली होती. तिथे तो राहत होता. आता त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे.

follow us