Giva kriti sanon ad controversy : GIVA च्या जाहिरातीमुळे वाद, कंपन्या जाणूनबुजून का घेतात रिक्स?

Giva Kriti Sanon Ad Controversy ज्वेलरी ब्रँड GIVAच्या अभिनेत्री कृति सेनॉनसोबतच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून असाच वाद निर्माण झाला आहे.

Giva Kriti Sanon Ad Controversy

Giva Kriti Sanon Ad Controversy

Giva Kriti Sanon Ad Controversy Controversy over GIVA’s advertisement do companies take such risks deliberately एखाद्या ब्रँडची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होते, त्यावर जोरदार टीका सुरू होते, बॉयकॉटची मागणी होते आणि काही वेळाने कंपनी ती जाहिरात मागे घेते. हे चित्र गेल्या काही वर्षांत अनेकदा पाहायला मिळाले आहे. सध्या ज्वेलरी ब्रँड GIVAच्या अभिनेत्री कृति सेनॉनसोबतच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून असाच वाद निर्माण झाला आहे.

22,000 कोटी रुपयांचे कर्ज अन् 6.5 कोटी रुपयांची परतफेड ; सुभाष चंद्रा पुन्हा चर्चेत

‘Giva’ या कंपनीच्या रक्षा बंधनाच्या (Raksha Bandhan) जाहिरातीत कृती सेननने भावासह एका श्वानालाही राखी बांधल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच तिच्या आऊटफिटवरुनही तिला ट्रोल करण्यात आलं. रिव्हिलिंग ड्रेसवरुन कृतीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. वाद वाढल्यानंतर GIVAने ही जाहिरात मागे घेतली आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा कंपनीचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, या निमित्ताने एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे तो म्हणजे कंपन्यांना अशा जाहिरातींमुळे होणाऱ्या वादाचा अंदाज आधीच असतो का? आणि असे असूनही त्या अशा जाहिराती का तयार करतात?

वाद झाला की ब्रँडला मिळते ‘फ्री पब्लिसिटी’

जाहिरात तयार करण्यासाठी कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र, एखादी जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली तर तिची चर्चा सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपोआप सुरू होते मार्केटिंगच्या भाषेत याला ‘अर्न्ड मीडिया’ म्हणजेच जाहिरातीसाठी अतिरिक्त पैसे न खर्च करता मिळणारी प्रसिद्धी असे म्हणता येते.

Sugar Rate Today : दिलासा, साखर 52 रुपये प्रतिकिलो तर गुळाच्या दरात तब्बल 1600 रुपयांची घसरण

सामान्य जाहिरात लोक काही सेकंदांत स्क्रोल करून पुढे जाऊ शकतात. मात्र, एखाद्या जाहिरातीवर वाद निर्माण झाला की, लोक ती पाहतात, त्यावर चर्चा करतात, पोस्ट शेअर करतात आणि प्रतिक्रिया देतात. परिणामी, ब्रँडचे नाव मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजेच, जाहिरात आवडली नाही तरी लोकांनी ती पाहिली, याचा फायदा ब्रँडला मिळू शकतो.

याआधीही अनेक ब्रँड अडकले वादात

GIVA ही अशा वादात सापडलेली पहिली कंपनी नाही. यापूर्वीही अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींवरून देशभरात चर्चा आणि टीका झाली आहे. यामध्ये फेअर अँड लव्हली, मान्यवर, केंट आरओ, अमूल माचो, झोमॅटो आदी कंपन्यांच्या जाहिरातींचा समावेस आहे. ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिरातींमध्ये गोरा रंग म्हणजे सौंदर्य आणि यशाशी संबंधित असल्याची धारणा निर्माण होत असल्याची टीका अनेक वर्षे होत होती. रंगभेदाविरोधातील वाढत्या चर्चेनंतर 2020 मध्ये कंपनीने ब्रँडचे नाव बदलून ‘ग्लो अँड लव्हली’ केले.

फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, अन्यथा… मुंबई आंदोलनावरून जरांगेंचा सरकारला इशारा

अभिनेत्री आलिया भट्टच्या मान्यवरच्या एका जाहिरातीमध्ये हिंदू विवाहातील ‘कन्यादान’ या परंपरेऐवजी ‘कन्यामान’ या संकल्पनेचा उल्लेख करण्यात आला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला. काहींनी ही जाहिरात धार्मिक परंपरांवर टीका करणारी असल्याचा आरोप केला होता. अमुल माचो या कंपनीने पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीतील अभिनेत्री सना खानच्या बोल्ड अंदाजावरूनही मोठा वाद झाला होता. विनोद आणि आकर्षक जाहिरात करण्याच्या प्रयत्नात ती जाहिरात अनेकांना अश्लील आणि असहज वाटली.

MPSC पेपर फुटीबाबत तपासात धक्कादायक माहिती समोर; परीक्षेच्या 2-3 दिवस आधीच पेपरफुटल्याच निष्पन्न

झोमॅटोच्या काही जाहिरातींवरूनही सोशल मीडियावर मोठा वाद झाला आहे. एका आउटडोअर जाहिरातीत ‘मॅक अँड चीज’ आणि ‘बटर चिकन’साठी वापरलेल्या शॉर्टफॉर्मवरून लोकांनी आक्षेप घेतला होता. 2021 मध्ये झोमॅटोच्या जलद डिलिव्हरीशी संबंधित जाहिरातीवरही टीका झाली होती. डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या जाहिरातीवर करण्यात आला होता.

वाद होतात मग जाहिरात एजन्सी अशा कल्पना देते तरी का?

आजच्या डिजिटल युगात ग्राहकांचे लक्ष वेधणे हे जाहिरातदारांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मोबाईलवर काही सेकंदांत शेकडो पोस्ट आणि जाहिराती समोर येतात. त्यामुळे ब्रँडला वेगळे दिसण्यासाठी ‘काहीतरी हटके’ करण्याचा दबाव असतो. याच कारणामुळे जाहिरात एजन्सी अनेकदा पारंपरिक कल्पनांना छेद देणाऱ्या किंवा सामाजिक रूढींवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या संकल्पनांच्या आधारावर जाहिराती तयार करतात. यातील काही जाहिराती इतक्या यशस्वी होतात की त्यांना आंतरराष्ट्रीय जाहिरात पुरस्कारांमध्येही गौरव मिळतो. कान्स लायन्ससारख्या पुरस्कारांमध्ये वेगळ्या आणि रूढी मोडणाऱ्या कल्पनांना मोठे महत्त्व असते. त्यामुळे ‘धाडसी’ जाहिरात बनवण्याच्या प्रयत्नात ब्रँड कधी कधी वादाच्या सीमारेषेपर्यंत पोहोचतो.

वादानंतर जाहिरात मागे घेण्याची रणनीती

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला, तर ब्रँडकडे दुसरा पर्यायही असतो एक म्हणजे जाहिरात मागे घेणे, स्पष्टीकरण देणे किंवा माफी मागणे. यामुळे कंपनी स्वतःला संवेदनशील आणि ग्राहकांच्या भावनांचा आदर करणारी म्हणून सादर करू शकते. मात्र, तोपर्यंत जाहिरात लाखो लोकांनी पाहिलेली असते. अशा परिस्थितीत कंपनीला दोन गोष्टी मिळतात एक म्हणजे ब्रँडची मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि ग्राहकांचे लक्ष. म्हणूनच काही मार्केटिंग तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वाद हा ब्रँडसाठी नुकसानकारकच असतो असे नाही. त्याचा परिणाम वादाचा आकार, ब्रँडची प्रतिमा आणि ग्राहकांची प्रतिक्रिया यावर अवलंबून असतो.

‘निगेटिव्ह पब्लिसिटी’ नेहमी फायदेशीर नसते

मात्र, वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवणे ही धोकादायक रणनीतीही ठरू शकते. जाहिरात लोकांच्या धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक भावनांना धक्का देत असेल तर, त्याचा परिणाम केवळ सोशल मीडिया चर्चेपुरता मर्यादित राहत नाही. बॉयकॉट, ग्राहकांचा रोष, ब्रँडवरील विश्वास कमी होणे आणि दीर्घकाळ टिकणारी नकारात्मक प्रतिमा यामुळे कंपनीला आर्थिक आणि प्रतिष्ठेचे नुकसानही होऊ शकते. म्हणूनच जाहिरात क्षेत्रात ‘चर्चेत राहणे’ आणि ‘वादात अडकणे’ यामधील फरक अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Video एक बिस्किट्स घेऊ? समय रैनाच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर अन् एकच हशा पिकला

शेवटी प्रश्न एकच जाहिरात पाहून लोकांनी ब्रँड लक्षात ठेवावा, हे कंपन्यांचे उद्दिष्ट असते. पण त्यासाठी किती वाद स्वीकारायचा, याची सीमारेषा कुठे आखायची GIVAच्या जाहिरातीवरील वादाने पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आणला आहे. ‘बॅड पब्लिसिटी हीदेखील पब्लिसिटी आहे’ हा मार्केटिंगचा फॉर्म्युला काही वेळा काम करू शकतो, मात्र ग्राहकांच्या भावना दुखावल्या तर हीच रणनीती ब्रँडसाठी उलटीही ठरू शकते.

 

Exit mobile version