वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’

वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’ मुंबई : ‘ग्रॅन टुरिस्मो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात खेळल्या गेलेल्या ‘ग्रॅन टुरिस्मो’ नावाच्या व्हिडीओ गेम सिरिजवर आधारित आहे. किशोर वयात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या जॅन मार्डनबरो या मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. थोडक्यात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित […]

Untitled Design (5)

Untitled Design (5)

वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’

मुंबई : ‘ग्रॅन टुरिस्मो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात खेळल्या गेलेल्या ‘ग्रॅन टुरिस्मो’ नावाच्या व्हिडीओ गेम सिरिजवर आधारित आहे. किशोर वयात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या जॅन मार्डनबरो या मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. थोडक्यात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे.

Link: https://youtu.be/_rkyssr5zvM

कशा प्रकारे अत्यंत कुशलपणे ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा व्हिडीओ गेम खेळणारा जॅन मार्डनबरो हा निसान ही व्हिडीओ गेम स्पर्धा जिंकतो आणि आपल्या खऱ्या आयुष्यात देखील जॅन मार्डनबरो हा एक व्यावसायिक काररेसर बनतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन नील ब्लोमकाम्प यांनी केले आहे. तर या चित्रपटामध्ये चित्रपटाची आर्ची माडेकवे मुख्य भूमिकेत आहे. जो जॅन मार्डनबरोची भूमिका साकारेल – एक व्यावसायिक ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर जो निसान जीटीचा सर्वात तरुण विजेता होता. तसेच डेव्हिड हार्बर, ऑर्लॅंडो ब्लूम, डॅरेन बार्नेट गेरी हॅलिवेल हॉर्नर आणि डिजीमन हौन्सौ यांच्या भूमिका आहेत.

सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया लवकरच सिनेमागृहात ‘ग्रॅन टुरिस्मो’ प्रदर्शित करत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version