धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या बलिदानाच्या संघर्षाची कहाणी मांडणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा भव्य प्रीमियर संपन्न

बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ याचा भव्य प्रीमियर सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

Untitled Design (36)

Untitled Design (36)

Grand premiere of ‘The Maharashtra Files’ concludes : धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूने काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेतले होते. न्याय आणि योग्य मोबदल्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाने प्रशासन व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या न्यायासाठीच्या लढ्याबाबत व्यापक चर्चा घडवून आणली होती. याच सामाजिक वास्तवाला स्पर्श करणारा आणि व्यवस्थेविरोधातील सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी मांडणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ याचा भव्य प्रीमियर सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

बंजारा समाजातील मान्यवर कुटुंबीय, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, माध्यम प्रतिनिधी तसेच चित्रपटाची संपूर्ण टीम यांच्या उपस्थितीत हा प्रीमियर सोहळा संपन्न झाला. प्रीमियरनंतर चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली असून सामाजिक आशय, वास्तववादी कथानक आणि प्रभावी मांडणीमुळे प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

समाजातील वंचित, दुर्बल आणि न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या घटकांच्या वेदना, भावना आणि वास्तव यांचे प्रभावी चित्रण *‘द महाराष्ट्र फाईल्स’*मध्ये करण्यात आले आहे. शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी सामान्य माणसाला करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे, शेतकरी आणि उपेक्षित समाजाच्या समस्या यांचे वास्तवदर्शी दर्शन या चित्रपटातून घडते. विशेष म्हणजे बंजारा समाजाच्या न्याय, हक्क आणि अस्तित्वाच्या प्रश्नांना पडद्यावर स्थान देणारा हा भारतातील पहिलाच चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये याबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

Toll Booth : टोल प्लाझाजवळ घर असेल तर टोल भरावा लागतो का? NHAI ने दिले स्पष्ट उत्तर

धर्मा पाटील यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत, समाजातील अनेक न ऐकल्या गेलेल्या आवाजांना आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य माणसांच्या वेदनांना या चित्रपटातून अभिव्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीची कथा न राहता संपूर्ण समाजाच्या भावना आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारा ठरतो.

चित्रपटाच्या निर्मितीपासून ते प्रदर्शनापर्यंतचा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला असला, तरी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाने संपूर्ण टीमने सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांचे फलित म्हणून आज ‘द महाराष्ट्र फाईल्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, समाजातील वास्तव प्रश्नांवर भाष्य करणारा एक महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे.

या भव्य प्रीमियर सोहळ्यास चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि निर्माते संजीव कुमार राठोड, क्रिएटिव्ह प्रोड्युसर शालिनी राठोड, आर्यन राठोड, नागेश भोसले, गौतमी पाटील, शकील शेख यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि बंजारा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी चित्रपटाच्या सामाजिक विषयाचे आणि वास्तववादी मांडणीचे विशेष कौतुक केले.

मला आणखी एक संधी द्या, व्हायरल व्हिडिओ कॉंट्रोव्हर्सीनंतर प्रणित मोरेने समोर येत मागितली माफी

या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे.

दमदार कथा, प्रभावी अभिनय, सामाजिक आशय आणि वास्तवाला भिडणारी मांडणी यांचा उत्कृष्ट संगम असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारा आणि विचारप्रवृत्त करणारा चित्रपट ठरत आहे. प्रीमियर शोदरम्यान चित्रपटाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, माध्यमांमधून होत असलेली चर्चा आणि प्रेक्षकांकडून व्यक्त होणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहता, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

Exit mobile version