Download App

Gurmeet Choudharyने वाराणसीत केले लेकीचे मुंडन; खास फोटो शेअर करत सांगितला ‘तो’ किस्सा

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee: चंदेरी दुनियेतील लवबर्ड्स गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) यांनी शिव (वाराणसी) शहराला भेट दिली आहे. या शहराला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरुबिना या कपलने त्यांची मुलगी दिविषाचे मुंडन केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांपैकी गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे त्यांच्या स्ट्रॉंग बॉण्डमुळे खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील (Social media) रिल्सला भरभरून प्रेम मिळतं.


या क्युट कपलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या कपलने वाराणसीत पाऊल ठेवताच त्यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या कपल स्टार्सची झलक पाहायला मिळाली. गुरमीत आणि देबिना यांची कुटुंब आणि परंपरेशी नाळ खूप घट्ट आहे. त्यांच्या मुलीचा मुंडन सोहळा वाराणसीत ठेवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देबिनाच्या आजीचा जन्म वाराणसीत झालेला होता. त्यामुळे गुरुबिना या जोडप्याने त्यांच्या प्रियजनांसाठी एक अविस्मरणीय कौटुंबिक सोहळा हा वाराणसीत आयोजित केला होता. यानिमित्ताने आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्याची संधी त्यांना मिळाली.

इतकच नाही तर गुरमीत आणि देबिना वाराणसीला गेल्यानंतर तिथल्या प्रसन्न वातावरणात खूप मग्न झाले होते. त्यांनी सायकल रिक्षात बसून अरुंद गल्ल्या पाहिल्या, तिथल्या जेवणाचाही आस्वाद घेतला ते ही अगदी एखाद्या पर्यटकासारखा. या दोघांना वाराणसीमध्ये एकत्र फिरताना पाहून, तिथल्या वातावरणाचा आनंद घेताना पाहून त्यांचे चाहते ही खुश झाले. देबिनाने तिच्या इंस्टाग्राम वर कॉमेंट करत लिहिले आहे की, ‘तुम्ही तुम्ही काही वेळातच आम्हाला ओळखले आणि आम्हा सर्वांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव

या दोघांनीही वाराणसी बद्दलचा अनुभव शेअर करत पोस्ट लिहिली आहे. वाराणसी बद्दलचे प्रेम व्यक्त करताना गुरमीत म्हणतो की, ‘वाराणसीमध्ये राहणं हा एक चांगला अनुभव आहे. मी कृतज्ञ आहे की, मी इथे माझ्या कुटुंबासोबत आलो. तसेच माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या या शहरात मी काही खास क्षण घालवले.येथील चाहत्यांकडून आम्हाला भरभरून प्रेम मिळाले. इथे पुन्हा लवकर येण्याची मी वाट पाहतोय’.

गुरमीत देबिना यांची मुलगी दिविषा हिचा मुंडन सोहळा वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर त्यांच्या प्रियजनांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांची मोठी मुलगी लियानाचा मुंडन सोहळा नसल्यामुळे या दोघांनी लियानाचे केस गंगेला अर्पण केले. गुरमीत आणि देबिना यांनी वाराणसीच्या त्यांच्या या खास सहलीचा आनंद घेतला, त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली आणि त्यांच्या कौटुंबिक क्षणांची झलकही शेअर केली आहे.

Tags

follow us