Upcoming Movie : करीना, तब्बू, क्रितीच्या ‘द क्रु’ मध्ये दिसणार ‘हा’ पंजाबी अभिनेता

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने गेल्या काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट ‘द क्रु’ ची घोषणा केली आहे. रिया कपूरने या चित्रपटामध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना घेतलं आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटामध्ये आणखी एका अभिनेत्याची […]

Untitled Design (92)

Untitled Design (92)

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने गेल्या काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट ‘द क्रु’ ची घोषणा केली आहे. रिया कपूरने या चित्रपटामध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना घेतलं आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

आता या चित्रपटामध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हा एक पंजाबी अभिनेता असून त्याचं नाव दिलजीत दोसांज आहे. दिलजीत दोसांज या अगोदर देखील करीना कपूर खानसोबत दिसला होता. या चित्रपटांची नावं म्हणजे गुड न्यूज, उड़ता पंजाब

निर्माती रिया कपूरने नुकताच ‘द क्रु’ या चित्रपटात पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज दिसणार आहे. याची घोषणा केली आहे. तीने सोशल मीडियावर एक पोस्टर रिलीज करत याची माहिती दिली. त्यामध्ये निर्मात्यांनी सांगितलं की, ‘आम्ही दलजीत दोसांझचं द क्रू मध्ये स्वागत करतो. आम्ही एक चांगला प्रोजेक्ट करू इच्छितो, दिलजीतचा चित्रपटला फायदा होईल. या चित्रपटाद्वारे आम्हाला एक अविस्मरणीय कथा प्रेक्षकांना द्यायची आहे. आम्हाला आनंद आहे की आम्हाला याच्याशी निगडीत एक उत्तम कलाकार मिळाला आहे.’

या चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर हा चित्रपट एअरलाईन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तीन महिलांबद्दल आहे. एअरलाईन्स उद्योगात काम करताना महिलांना येणाऱ्या अडचणींचा या क्रूमध्ये अभ्यास केला जाईल. द क्रू या चित्रपटाची निर्मिती राजेश कृष्णन करणार आहेत. करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा क्रू या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे.

Exit mobile version