Happy Birthday Nargis Fakhri : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी ( Nargis Fakhri ) आज तिचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिला शुभेच्छा देत आहेत. नर्गिसने 2011 मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमातील नर्गिसचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. यानंतर नर्गिस ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘ढिशूम’ सारख्या सिनेमात दिसली. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून नर्गिसची स्क्रीन प्रेझेन्स कमी झाली आहे.
नर्गिस फाखरी या जबरदस्त अभिनेत्री नेहमीच आपल्या विविध भूमिकांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. ‘रॉकस्टार, मद्रास कॅफे आणि मैं तेरा हिरो सारख्या बॉलीवूड सिनेमामधील अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी आता ओटीटी क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.’तत्लुबाज’ या वेब सीरिजमधून नर्गिस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासाठी ती खूप उत्सुक आहे, पण नर्गिसनं आता स्वतःसाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत.
2015 च्या कॉमेडी स्पायमध्ये काम करून नर्गिस फाखरीने हॉलिवूडमध्येही प्रवेश केला आहे. या स्टार-स्टडेड सिनेमात तिला मेलिसा मॅककार्थी, जेसन स्टॅथम, रोझ बायर्न आणि ज्यूड लॉ सारख्या ए-लिस्टर्ससोबत दाखवले. नर्गिसने लिया या गुप्तहेराची भूमिका साकारली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि जागतिक स्तरावर तिने तिचे एक अनोखे स्थान निर्माण केले आहे.
Tiger Nageshwar Rao: ‘या अनोख्या कथेचा एक भाग..’, अनुपम खेर यांनी सांगितलं यामागचं गुपित
दरम्यान, नर्गिस ‘तत्लुबाज’ या वेब सीरिज व्यतिरिक्त कृष जगरलामुदी लिखित आणि दिग्दर्शित ‘हरि हर वीरा मल्लू’ चित्रपटात दिसणार आहे. हा अॅडव्हेंचर चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नर्गिस व्यतिरिक्त निधी अग्रवाल, बॉबी देओल, पवन कल्याण हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.