Hemangi Kavi : मराठीतील अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला (Hemangi Kavi) ओळखले जाते. ती सोशल मीडियावर (Social media) तिचे मत बिनधास्तपणे मांडत असल्याचे दिसून येत आहे. महिलांबद्दल कोणताही विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबद्दल अगदी बिन्दास्त बोलत असल्याचे दिसून येडत आहे. नुकतंच हेमांगी कवीने तिच्या आई- वडिलांबद्दल आणि घरातील प्रायव्हसीविषयी (Privacy) मोठं वक्तव्य केले आहे.
हेमांगीने आतापर्यंत नाटक, मालिका, सिनेमा यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये काम केले आहे. तिने विविध भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात चांगले स्थान निर्माण केले आहे. हेमांगी कवी ही कायम तिच्या वैयक्तिक गोष्टींने चर्चेत असल्याचे दिसून येते. हेमांगीने ‘प्लॅनेट मराठी’वर ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत.
आम्ही १८० च्या खोलीत राहत असायचो. माझी आई सातवी शिकली होती. आम्ही गावात राहिलेले आहे आणि बाबांचे मात्र एलएलबी शिक्षण झाले आहे. आमच्या घरात बराच मोकळेपणा होता. ‘टायटानिक’, ‘दयावान’ यासारखे अनेक सिनेमा आम्ही सर्वजण सोबत बसून बघितले आहे. किसिंग सीन लागला की रिमोटची शोधाशोध होत असायची, काहीही आमच्या घरी व्हायचं नाही. इंटिमेट सीन सुरु झाला की पळापळ वैगरे असं कधीच काही व्हायचं नाही.
आम्ही ते बघत बसायचो”, असेही ती म्हणाली. हे आता बघायचं नाही, हे वाईट आहे, असं त्यांनी कधी केले नाही. ही जवळपास ९३- ९४ काळामधील गोष्ट आहे. तेव्हा माझ्या काही मैत्रिणींच्या घरी हे लपवले जातं असायचे, याचा मला पत्ताच नव्हता. मला तेव्हा वाटायचं ही सर्व नॉर्मल आहे”, असेही तिने यावेळी सांगितले. त्यावेळी सर्वजण वन रुम किचन या अशा घरात राहत असायचे. बाबा- आईची प्रायव्हसी वैगरे हे सगळं आम्ही बघितलेले आहे.
Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव
जे मी पहिल्यांदा ते बघितलं होतं, तेव्हा मी ताईला विचारलं होतं की ‘आई-बाबा नेमकं काय करत होते ?’ तेव्हा माझ्या ताईने ‘हे असंच असतं आणि या गोष्टींमुळे आपण आलेलो आहोत.’ आपण जागे असतो. सर्वांनी या गोष्टी बघितलेल्या असतात. ते केल्यामुळे आमचा जन्म झाला आहे, आम्ही या जगामध्ये आलो आहोत, याची समज यायला हवी”, असे हेमांगी कवीने यावेळी सांगितले आहे.