Download App

Jhimma2: ‘झिम्मा 2’चे चित्रपटगृहात अर्धशतक, बॉक्स ऑफिसवर 50व्या दिवशीही यशस्वी घौडदौड

Jhimma 2 Box Office: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा २’ (Jhimma 2 Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. (Marathi Movie) ५० दिवसांनंतरही (Box Office) चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ (Jhimma 2) हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे.


कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’नंतर जिओ स्टुडिओजचा हा 2023 मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे.

‘झिम्मा २’ ला मिळालेल्या प्रेमाबद्दलबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ झिम्मा २ चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता. प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी, हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. आज ५० दिवसांचा गाठलेला टप्पा आणि त्याच्या उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव केवळ ‘झिम्मा २’ चा नसून आपल्या सर्वांचा आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी ‘झिम्मा २’ ची संपूर्ण टीम मनापासून आभारी आहे.”

Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्या धमाकेदार ‘भाऊचा नादखुळा’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, आतापर्यंत आम्हाला प्रेक्षकांनी जे प्रेम दिले असेच प्रेम यापुढेही द्याल याची खात्री आहे. ज्यांनी ‘झिम्मा 2’ पाहिला त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा, असं आवाहनही हेमंत ढोमे यांनी केलं आहे. ‘झिम्मा 2’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे. तर इरावती कर्णिकने लेखन केलं आहे. तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग या अशी दमदार कलाकारांची भूमिका आहे

follow us