तेलुगूमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर नानी स्टारर ‘आया शेर’चे हिंदी व्हर्जन रिलीज; ‘द पैराडाइज’ने रचला विक्रम

The Paradise  :  नानीच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या तेलुगू व्हर्जनला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर ‘आया शेर’ हे यंदाच्या वर्षातील सर्वात मोठे हिट गाणे

The Paradise

The Paradise

The Paradise :  नानीच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या तेलुगू व्हर्जनला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर ‘आया शेर’ हे यंदाच्या वर्षातील सर्वात मोठे हिट गाणे ठरले आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनंतर आता त्याचे हिंदी व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे. द पैराडाइज या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेलिब्रेशनचा उत्साह आणखी वाढवला आहे. तेलुगू गाण्याच्या विक्रमी यशानंतर आता “आया शेर”चे हिंदी व्हर्जन अधिकृतपणे रिलीज करण्यात आले आहे. नेचुरल स्टार नानी (Nani) यांच्या वाढदिवशी प्रदर्शित झालेल्या तेलुगू आवृत्तीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्या जबरदस्त यशानंतर आणि हिंदी व्हर्जनच्या वाढत्या मागणीमुळे आता हे गाणे हिंदीतही उपलब्ध झाले असून यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचे सर्वात मोठे हिट गाणे ठरले आहे.

“आया शेर” म्हणजेच “शेर आला”  ही ओळच गाण्याचा दमदार अंदाज स्पष्ट करते. हे गाणे आधीच एक पॉवर-पॅक अँथम बनले आहे. तेलुगू (Telugu) व्हर्जनने रिलीज होताच यूट्यूब चार्ट्स आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता आता हिंदी व्हर्जनलाही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

तेलुगू व्हर्जनने यूट्यूबवर 44 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि 1 मिलियनपेक्षा जास्त लाइक्सचा टप्पा ओलांडला आहे. हे गाणे सध्या ट्रेंडिंग ट्रॅक्समध्ये अग्रस्थानी आहे. जगभरातील चाहते इंस्टाग्रामवर नानी यांच्या एनर्जेटिक हुक स्टेपची नक्कल करत रील्स शेअर करत आहेत.

चित्रपटातील नानींसाठी हे एक दमदार इंट्रोडक्शन ट्रॅक ठरले आहे. “आया शेर”चे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले असून कोरिओग्राफी सुधान मास्टर यांनी केली आहे. रॉ एनर्जी, थिरकणारे बीट्स आणि नानी यांची ट्रेडमार्क इंटेन्सिटी यामुळे हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. त्यांच्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि डायनॅमिक डान्स मूव्ह्समुळे हा ट्रॅक एक सांस्कृतिक क्षण ठरला असून चाहते त्याचा थिएटरमध्ये उत्सव साजरा करत आहेत.

‘द पैराडाइज’ हा दिग्दर्शक श्रीकांत ओडेला (Srikant Odella) यांचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यांच्या पदार्पणाच्या दसरा या चित्रपटाला प्रचंड प्रशंसा मिळाली होती. अनिरुद्ध यांच्या दमदार संगीतासोबतच अरजुन चांडी यांच्या आवाजाने गाण्याला वेगळीच उंची दिली आहे, ज्यामुळे चित्रपटाची भावनिक खोली आणि भव्यता अधिक प्रभावी बनली आहे.

भारताला मोठा धक्का; संजू सॅमसनला सेमीफायनलसाठी येणार बंदी, कारण काय ?

SLV सिनेमाजच्या निर्मितीत साकारलेला ‘द पैराडाइज’ 21 ऑगस्ट 2026 रोजी आठ भाषांमध्ये भव्य जागतिक प्रदर्शित होणार आहे. दूरदृष्टी असलेले दिग्दर्शन, प्रभावी अभिनय आणि यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा म्युझिकल हिट या जोरावर हा चित्रपट एक जागतिक सिनेमॅटिक इव्हेंट ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version