How important scenes in Mahesh Babu starrer ‘Varanasi’ were shot : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे त्यांच्या भव्यदिव्य मांडणीसाठी आणि कल्पक कथनशैलीसाठी ओळखले जातात. सिनेमा नव्या उंचीवर नेणारे हे दिग्दर्शक आता आपल्या आगामी मेगा अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट ‘वाराणसी’च्या प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात महेश बाबू, प्रियंका चोपड़ा जोनास आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सध्या हा चित्रपट देशातील सर्वाधिक चर्चेत आणि प्रतीक्षेत असलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एक ठरला आहे.
चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत असताना, राजामौली यांनी खुलासा केला की ‘वाराणसी’ मधील अनेक महत्त्वाचे सिक्वेन्स हैदराबादमधील Annapurna Studios येथे नुकत्याच सुरू झालेल्या अत्याधुनिक मोशन कॅप्चर सुविधेमध्ये चित्रित करण्यात आले आहेत. ही सुविधा भारतातील सर्वात प्रगत मो-कॅप लॅब मानली जाते. राजामौली म्हणाले की , त्यांच्या आधीच्या चित्रपटांच्या वेळी अशा दर्जाची सुविधा भारतात उपलब्ध नव्हती. “भारतामध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञ नेहमीच होते आणि ते मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रॉडक्शनमध्ये योगदान देत होते.
मात्र आपल्या देशात अत्याधुनिक सुविधा नसल्याची कमतरता होती. बाहुबली: द बिगिनिंग किंवा ईगा सारख्या चित्रपटांकडे मागे वळून पाहताना वाटते की, जर त्या काळात भारतात मोशन कॅप्चर तंत्रज्ञान उपलब्ध असते, तर मी ते आणखी भव्य पद्धतीने साकारू शकलो असतो,” असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले , “A&M च्या मोशन कॅप्चर तंत्रज्ञानामुळे ती उणीव आता भरून निघाली आहे. यामुळे भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या कथा कल्पना करण्याच्या आणि त्या पडद्यावर साकार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होईल.
काँग्रेस की राष्ट्रवादी शरद पवार गट, राज्यसभेसाठी रस्सीखेच सुरु; बैठकीत काय घडलं?
आता आपल्याला काम आउटसोर्स करण्याची गरज भासणार नाही. मी जगभरातील अनेक मोशन कॅप्चर सुविधा पाहिल्या आहेत, पण A&M देत असलेली अचूकता आणि परफॉर्मन्स यांचा मेळ खरोखरच उत्कृष्ट आहे. ‘वाराणसी’मधील काही महत्त्वाचे सिक्वेन्स आम्ही येथे शूट केले असून त्याचे परिणाम अत्यंत प्रभावी ठरले आहेत.” ‘वाराणसी’ भारतात प्रदर्शित होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे.
चित्रपटाची पहिली झलक पॅरिसमधील Le Grand Rex येथे आयोजित ‘ट्रेलर फेस्टिव्हल’मध्ये दाखवण्यात आली. युरोपमधील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित चित्रपटगृहांपैकी एक असलेल्या या थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच फ्रेमपासून टाळ्या, जल्लोष आणि शिट्ट्यांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.
दरम्यान, चित्रपटातील पात्रांचे लुक्स आधीच समोर आले आहेत. महेश बाबू ‘रुद्र’च्या दमदार भूमिकेत, पृथ्वीराज सुकुमारन ‘कुंभ’च्या तीव्र अवतारात, तर प्रियंका चोप्रा जोनास ‘मंदाकिनी’च्या प्रभावी भूमिकेत दिसणार आहेत. या पोस्टर्सनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भव्य सिनेमाई अनुभव देणारा ‘वाराणसी’ हा चित्रपट 7 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
