Download App

बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ वॉर 2 मध्ये कसा दिसणार? कॉस्ट्युम डिझायनर सांगितली लूकची खासियत

Hrithik Roshan पुन्हा एकदा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील आपल्या कबीर या सुपर-स्पायच्या भूमिकेत वॉर 2 मध्ये दिसणार आहे.

How will Bollywood’s ‘Greek God’ Hrithik Roshan look in War 2? Costume designer reveals the special features of the look : बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार ऋतिक रोशन ( Hrithik Roshan) पुन्हा एकदा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील आपल्या कबीर या सुपर-स्पायच्या भूमिकेत वॉर 2 मध्ये दिसणार आहे. टीझरमध्ये त्याच्या स्टायलिश आणि आत्मविश्वासपूर्ण लूकने सोशल मीडियावर प्रचंड धूम उडवली आहे.

भाजप नेत्याने इंद्रायणी पूल दुर्घटनेची जबाबदारी झटकली; म्हणाले, सूचना दिल्या होत्या, पण…

चित्रपटाचीची कॉस्ट्युम डिझायनर अनाइता श्रॉफ अदजानिया यांनी सांगितले की, वॉर 2 मध्ये ऋतिकचा करिष्मा अधिक प्रभावी आणि खोलगट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अनाइता म्हणते ,”धूम 2, बॅंग बॅंग आणि अनेक जाहिरातींनंतर वॉर हा एक वेगळा टप्पा होता. आपण ‘ग्रंज’ लूकपासून दूर जाऊन एक अधिक क्लीन, शार्प आणि तरीही धाडसी लूक तयार केला—जणू सुपरहिरो ( Hrithik Roshan) साध्या कपड्यांतच. निर्धार असलेला पण सहज वाटणारा लूक.”

…पण धीरूभाईंच्या मागे ईडी नाही लागली; ‘त्या’ वक्तव्यावरून राऊतांचा अजित पवारांना टोला

त्या पुढे म्हणतात “वॉर 2 मध्ये कबीर ( Hrithik Roshan) या पात्रामध्ये अधिक गडद आणि भावनिक बाजू उलगडण्याचा प्रयत्न आहे. फॅब्रिक्स अधिक साधे, वापरलेले वाटणारे, थोडे बिनदिक्कत, पण तरीही ती धार त्याच्या व्यक्तिमत्त्वातून स्पष्टपणे दिसते.” अनाइता सांगते , “वॉरमध्ये जे यशस्वी ठरले—जसं त्याचा कटिंग लूक, करिष्मा—ते सगळं घेऊन त्यावर आणखी काम केलं आहे. लूक, अटिट्यूड आणि संयम यांचं सुंदर मिश्रणच वॉर २ साठी कबीरला खास बनवतं.”

बडगुजरांच्या गुडघ्याला बाशिंग; हजारो कार्यकर्यांसह निघाले मुंबईला, बावनकुळेंनी मात्र बॉम्ब फोडला

आदित्य चोप्रा यांच्या निर्मितीखाली आणि अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला वॉर 2 मध्ये ऋतिकसमोर ( Hrithik Roshan) असतील साऊथचे सुपरस्टार एनटीआर , जो ‘मॅन ऑफ द मासेस’ म्हणून प्रसिद्ध आहे.फिल्ममध्ये कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. वॉर 2, 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

follow us