Download App

Fighter: जाळ अन् धूर संगटच! हृतिकच्या ‘फायटर’चं नवं पोस्टर आऊट, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Hrithik Roshan Fighter New Poster Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या ‘फायटर’ (Fighter) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत असल्याचे बघायला मिळत आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचे नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.


‘फायटर’ या सिनेमाची चाहते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. आता या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत दिग्दर्शकाने या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत सांगितले आहे की, या पोस्टरवर ‘फायटर 100 दिवस’ असे लिहिल्याचे बघायला मिळत आहे. फायटर हा सिनेमा 2024 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे.

Boys 4 : ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र; बॅाईज 4 मधील आणखी एक गाणं रिलीज…

‘फायटर’ या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच करण सिंह ग्रोवर आणि तलत अजीज हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात अॅक्शनचा तडका चाहत्यांना बघायला मिळणार आहे. हा सिनेमा २५० कोटींचा गल्ला कमावणार असल्याचं म्हटलं जात आहे. हृतिक रोशननेही ‘फायटरला 100 दिवस’ असं म्हणत या सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

तसेच पठाण सिनेमात दीपितासोबतच किंग खान, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील मुख्य भूमिकेत होते. आता सिद्धार्थच्या फायटर या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे.

Tags

follow us