Abhishek Singh On Nana Patekar : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी शूटिंगदरम्यान सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका चाहत्याच्या डोक्यावर मारलं होतं. शिवाय, त्याच्यावर ओरडून त्याला निघून जाण्यास सांगितलं होतं. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. यानंतर विविध स्तरांतून नानांना नाराजी पत्करावी लागली. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी स्वतः माफी मागितली. दरम्यान, आता निलंबित अधिकारी अभिषेक सिंह (Abhishek Singh) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सचिनची लेक अन् रश्मिका ‘डीपफेक’च्या जाळ्यात; मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय
अभिषेक सिंह यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. यासोबतच त्यांनी नाना पाटेकर यांना एक सल्लाही दिला आहे. या व्हिडिओतIAS अभिषेक सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशातील लोकांना प्रतिक्रिया कशी द्यायची हे चांगलेच माहीत आहे. आमचं सगळंच काही उत्तम आहे. सर्व बाजूंनी परिपूर्ण आहोत. आम्ही पाहूण्याचं स्वागत उत्तम करतो. त्यांचा आदरही उत्तम करतो. आणि आमची युपी (उत्तम पिटाई) देखील चांगली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही याल, तेव्हा ह्या बाबी ध्यानात ठेवा.
Animal Trailer: ‘बापासाठी जग पेटवायला निघाला…’ रणबीर कपूरच्या अॅनिमल’चा ट्रेलर रिलीज
पुढच्या वेळी जेवढे नाना लोक यूपीमध्ये येणार आहेत, त्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही जेव्हाही याल तेव्हा उत्तम चरित्रसोबत या आणि उत्तम व्यवहार ठेवा. तुमच्यासोबत असं होऊ नये की, तुमचे स्वागत इतक्या असं होईल की, घरचेही तुम्हाला ओळखणार नाहीत. बाकी तुम्ही या, आम्ही तुमचे स्वागत करतो, असं सिंह म्हणाले.
नानांनी मागितली होती माफी
नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती. नाना म्हणाले होते की, तो कोण आहे हे याची मला कल्पना नव्हती. मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून नियोजित तालीम नुसार मी त्याला मारले आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच करणार नाही… जे काही झाले ते चूक होते. काही गैरसमजातून हे घडले. मला माफ करा, मी असं पुन्हा कधीच करणार नाही.
नाना पाटेकर यांनी जेव्हा तरुणाला मारलं होतं, त्यानंतर काही दिवसांनी एका पत्रकार परिषदेत माजी आयएएस अभिषेक यांनी हा प्रकार चुकीचे असल्याचे म्हलटं होतं. ते म्हणाले होते, ‘पीडित तरुणाने आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही कारवाई करू. पीडित तरुणाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. दरम्यान, आयएएस अभिषेकच्या धमकीला नाना काय प्रत्युत्तर देतील हेच पाहणं महत्वाचं आहे.