Adipurush controversy : ‘आदिपुरुष’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. चित्रपटाच्या टीझरवरून सुरू झालेला वाद रिलीज झाल्यानंतरही सुरूच आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसोबतच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र न देण्याचे आदेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, या चित्रपटात रामायणाची विटंबना करण्यात आली आहे. या चित्रपटातून आपल्या संस्कृतीची खिल्ली उडवली आहे. दुसरीकडे, नेपाळची राजधानी काठमांडूच्या सिनेमागृहात ‘आदिपुरुष’ या पौराणिक चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. काठमांडूच्या महापौरांनी निर्मात्यांना चूक दुरुस्त करून सीतेच्या जन्मस्थानाची योग्य माहिती देण्यास सांगितले आहे.
सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? देवेंद्र फडणवीसांची टीका
महापौरांनी फेसबुकवर लिहिले की, ‘आदिपुरुष’ या दक्षिण भारतीय चित्रपटातील ‘जानकी भारत की बेटी है’ ही ओळ जोपर्यंत नेपाळमध्येच नाही तर भारतातही हटवली जात नाही, तोपर्यंत काठमांडू सिटी (sic) मध्ये कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही.
नेपाळच्या चित्रपट प्रमाणन मंडळाने असेही म्हटले आहे की चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवण्याची परवानगी तेव्हाच दिली जाईल जेव्हा ‘सीता ही भारताची कन्या आहे’ असा संवाद बदलला जाईल. पौराणिक ग्रंथानुसार सीतेचा जन्म नेपाळमध्ये असलेल्या जनकपूरमध्ये झाला असे मानले जाते. शाह यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये निर्मात्यांना तीन दिवसांत संवाद बदलण्यास सांगितले आहे.
Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्यावरील फसवणुकीचे सर्व गुन्हे रद्द, सीबीआयने दिली क्लीन चिट
आदिपुरुष या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चनंतर वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये राम, सीता, हनुमान आणि रावण यांच्या पात्रांवर आणि दिसण्यावर अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता. या सर्व वादानंतर ओम राऊत यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवली होती.