‘वेड’चं ‘याड लागलं..’ मोडला सैराटचा रेकॉर्ड

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. दुसऱ्या विकेंडला सर्वाधिक कमाई करत वेडने सैराटचाही […]

Ved

Ved

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. दुसऱ्या विकेंडला सर्वाधिक कमाई करत वेडने सैराटचाही विक्रम मोडला आहे.
या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई केली आहे. ‘वेड’ या चित्रपटाने आता नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चाही विक्रम मोडला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने 5.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कमाईच्या या आकड्यासह चित्रपटाने सुपरहिट ‘सैराट’चा विक्रम मोडला आहे.

व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरलेला सैराटने सिनेमागृहात चालत असताना कोणत्याही दिवशी एवढी कमाई केली नव्हती. सैराटला मागे टाकत दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कोटींची कमाई ‘वेड’ने केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सैराटची सर्वाधिक कमाई 4.61 कोटींची होती. मंजुळेंच्या सैराटने सिनेमानेही दुसऱ्या रविवारीच ही सर्वात जास्त कमाई केली होती. सैराटचा हा रेकॉर्ड आता ‘वेड’ने मोडला.

पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची चांगली कमाई झाली. या कमाईत 27.50 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. आतापर्यंत या चित्रपटाने 33.42 कोटी रुपये कमावले असून. पहिल्या आठवड्यात वेडने 10 कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या आठवड्यात 12.75 कोटी रुपयांची कमाई झाली.

वेड चित्रपटाने दुसऱ्या विकएन्डला कमाईत जबरदस्त उंची गाठलीय. दुसऱ्या आठवड्यात विकएन्डला शुक्रवारी 2.52 कोटी कमावले. तर शनिवारी 4.53 कोटी इतकी कमाई झाली. तर रविवारी या चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली. रविवारी या चित्रपटाने 5.70 कोटींचा गल्ला गाठला आहे. तेव्हा या चित्रपटाची एकूण 33.42 इतकी कमाई झालीय.

वेड हा चित्रपट शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ते देखील खरे ठरले. तर आता दुसऱ्या विकेंडला सर्वाधिक कमाई करत वेडने सैराटचाही विक्रम मोडला आहे.

वेड या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर, शुभंकर तवडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

Exit mobile version