“हिल पोरी हिला” गाण्याची भारताला भुरळ भारताच्या यूट्यूब मध्ये 24 व्या क्रमांकावर गाणं होतंय ट्रेंड !

दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते.

Untitled Design 24 1

Untitled Design 24 1

India is fascinated by the song “Hil Pori Hila” : गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची बहुचर्चित जोडी या गाण्यात एकत्र बघायला मिळाली असून आता फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात हे गाणं ट्रेंड होतंय. दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याचा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून गेला आहे. भारताच्या यूट्यूब लिस्ट मध्ये 24 व्या क्रमांकावर हे गाणं सध्या ट्रेंड होताना दिसतंय. गौतमी आणि भाऊ यांची जोडी प्रेक्षकांना तर मोहित करून गेली. सोशल मीडिया वर देखील गाण्याचा चर्चा होत असून ही नवी जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तब्बल 52 वर्षांनंतर या गाण्याला आधुनिक संगीत आणि नव्या सादरीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या गाण्यात महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहे.

इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतीय शेअर बाजाराला; सेन्सेक्स 821 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले असून, हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे म्युझिक व्हिडीओला वेगळे आकर्षण लाभले आहे. गाण्यामध्ये गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांनी विविध आकर्षक लूक साकारले असून गौतमी पाटील लाल रंगाच्या पारंपरिक नऊवारी साडीत दिसत आहे तर पुढील काही सीनमध्ये दोघेही काळ्या वेशभूषेत, रेट्रो स्टाईल आणि वेस्टर्न लूकमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या लूकसोबतच दोघांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त नृत्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

याशिवाय अनेक नेटकऱ्यांनीही या नव्या जोडीचे आणि गाण्याच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले आहे. गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला, दोघांनीही जबरदस्त डान्स केला आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version