Download App

Salman Khan: जीवे मारण्याच्या धमकीनंतर भारतात राहण्याबाबत भाईजानचे मोठे विधान

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. भाईजानला गेल्या काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी (threat) सतत देण्यात येत आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भाईजानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीनंतर आता भाईजानने भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे.


सलमान म्हणाला, मला कितीही धमक्या मिळाल्या तरीही यूएईमध्ये सुरक्षित वाटत आहे. पण भारतामध्ये मला मोठी समस्या निर्माण झाली आहे. “मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण सुरक्षेत जात आहे. मला माहिती आहे की, कितीही प्रयत्न केला तरी जे व्हायचे ते होणार आहे. मला वाटते देव आहे. याचा अर्थ मी उघडपणे फिरायचे असा नाही. आता माझ्या आजूबाजूला खूप सारे शेरा आहेत. माझ्याभोवती इतक्या बंदुका आहेत की, कधीकधी मलाच भीतीच वाटते.

जे काही मला आता सुनावले जात आहे, या सर्व गोष्टी मी करत आहे. ‘किसी का भाई, किसी की जान’ सिनेमात एक डायलॉग आहे. त्यानुसार तुम्हाला १०० वेळा भाग्यवान असावे लागते. पण मला फक्त एकदा भाग्यवान ठरायचे आहे. यामुळे मला फार काळजी घ्यावी लागणार असल्याचे यावेळी भाईजानने सांगितले आहे.
पुढे भाईजान म्हणाला, असुरक्षित असण्यापेक्षा सुरक्षा असणे कधीही चांगले.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

आता मला रस्त्यावर सायकल चालवणे किंवा कुठे एकटे जाणे देखील शक्य नाही. जेव्हा वाहतूककोंडी झालेली असते, तेव्हा इतकी सुरक्षा असते, वाहनांमुळे चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. चाहते माझ्याकडे एक कटाक्ष टाकत असतात. गंभीर धमकी असल्यानेच सुरक्षा देण्यात आली आहे, असेही भाईजान यावेळी म्हणाला.

Tags

follow us